सपना चौधरीच्या (Sapna Choudhary) चाहत्यांची निराशा करणारी बातमी समोर आली आहे. सपना चौधरीने सोशल मीडियापासून काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती खुद्द हरियाणवी स्टारने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.
सपना चौधरीने सांगितले की, तिची तब्येत खराब आहे. हे ऐकून तिचे चाहते चिंतेत पडले आहेत. देसी क्वीनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरी शेअर केली आणि लिहिले की, “राम राम, प्रकृती अस्वास्थ्यामुळे अपडेट राहणार नाही. क्षमस्व. लवकरच भेटू.” सपनाची ही पोस्ट केल्यापासून तिचे चाहते काळजीत पडले आहेत. सपना चौधरी आता आपले मनोरंजन करणार नाही, या विचाराने काही लोक नाराज आहेत, तर काहींना सपना चौधरीच्या तब्येतीची चिंता लागली आहे. (sapna choudhary has taken break from social media due to this reason)

सपना चौधरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती फोटो आणि रील्स शेअर करून तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते. मात्र, आता हरियाणवी स्टार काही दिवस तिच्या चाहत्यांना स्वतःबद्दल अपडेट देऊ शकणार नाही. तसेच, सपना सोशल मीडिया अकाऊंटवरून किती दिवसांचा ब्रेक घेत आहे, याची माहिती तिने दिली नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मध्य प्रदेशातील सतना येथे एका लाईव्ह शोदरम्यान सपना चौधरीची तब्येत अचानक बिघडली. स्टेजवर डान्स करत असताना तिच्या पोटात प्रचंड दुखू लागले. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सपना घरीच स्वतःची काळजी घेत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










