Tuesday, December 23, 2025
Home बॉलीवूड अमृता रावचा पती अनमोलने लग्नापूर्वी केली होती ‘अशी’ मागणी, ऐकून अभिनेत्रीला बसला धक्का

अमृता रावचा पती अनमोलने लग्नापूर्वी केली होती ‘अशी’ मागणी, ऐकून अभिनेत्रीला बसला धक्का

बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव (Amrita Rao) चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खूप चर्चेत असते. अमृता नेहमीच खासगी व्यक्ती राहिली आहे. ती तिच्या आयुष्याबद्दल फारशी कधीच बोलली नाही. मग तिचे आरजे अनमोलसोबत नाते असो वा नंतर लग्न. तेही त्यांनी नेहमीच खासगी ठेवले. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता हे जोडपे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील बोलत आहेत. त्यांच्या डेटिंगच्या दिवसांपासून ते लग्नापर्यंत आणि अगदी बाळाबद्दल देखील बोलली आहे. ज्याची व्हिडिओ क्लिपही तिने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

अभिनेत्रीने तिच्या गुपचूप केलेल्या लग्‍नाची देखील माहिती दिली आहे. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अमृता रावने अनेक मजेदार किस्सेही शेअर केले. अमृता रावला विचारण्यात आले की, तिने तिच्या लग्नाबद्दल गुप्तता का ठेवली? तिने २०१६ मध्ये लग्नाबद्दल जगाला सांगितले, तर २०१४ मध्येच तिचे लग्न झाले होते. आपल्या गुप्त लग्नाबद्दल बोलताना अमृता राव म्हणाली की, “होय, आमचे लग्न २०१४ मध्ये झाले होते. लग्नाला फक्त खास कुटुंबीयच उपस्थित होते.”

‘यामुळे’ लग्नाबाबत ठेवली गुप्तता
ती पुढे म्हणाली की, “त्यावेळी सोशल मीडिया नव्हता. आतापेक्षा जग खूप वेगळं होतं. माझ्या लग्नाच्या बातमीने माझ्या कारकिर्दीतील अनेक गोष्टी नष्ट होऊ शकतात. चांगली गोष्ट म्हणजे अनमोलला हे माहीत होते. तसेच योग्य वेळी लग्न होणे गरजेचे होते. गुपचूप लग्नाची कल्पना प्रथम अनमोलला आली आणि मी उत्साहाने उडी घेतली. आमच्या लग्नात फक्त घरातील सदस्यच होते कारण आम्हाला वाटतं लग्न हे खूप वैयक्तिक आहे. तुमची खास माणसंच खरी आनंदी असतात.”

 करिअर सोडण्याची केली होती मागणी
अमृता रावने या मुलाखतीत खुलासा केला की, अनमोलला (Anmol) २०१२ मध्येच अमृता रावशी लग्न करायचे होते आणि अभिनेत्रीने तिचे अभिनय करिअर सोडावे अशी इच्छा होती. अमृता राव म्हणाली की, “त्यावेळी अनमोल पाहत होता की, माझ्या करिअरचा आलेख सतत खाली जात आहे. मी किसिंग सिंग किंवा इंटिमेट सीन करण्यास कंफर्टेबल नव्हते.”

अनमोलने मागितली माफी
अमृता राव पुढे म्हणाली की, “आम्हाला वाटले की, आपण आपल्या सुंदर वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. अनमोलने मला करिअर सोडायला सांगितल्याचे ऐकून मला धक्काच बसला.” नंतर त्याला आपल्या चुकीबद्दल खूप पश्चाताप झाला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा