बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) नेहमीच तिच्या चित्रपटातील अभिनयासाठी चर्चेचा विषय ठरत असते. तिने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. दिशा पटानी तिच्या ग्लॅमरस फोटोंनी इंटरनेटचा पारा चढवत असते. तिचे एकापेक्षा एक हटके ड्रेस पाहून अनेक मुली तिला फॉलो करतात, तर दुसरीकडे तिचे सौंदर्य पाहून तरुणांच्या काळजात घंटी वाजू लागते. ही सोशल मीडिया प्रेमी आहे आणि तिचे फोटो व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना तिच्याबद्दल अपडेट देत असते. दिशा पटानी फिटनेस फ्रीक देखील आहे आणि ती इतरांनाही प्रेरणा देत असते. दिशा पटानीने तिच्या वर्कआऊटने चाहत्यांना वेड लावले आहे. ज्याचा एक मस्त व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, ती पिवळ्या रंगाची शॉर्ट्स आणि स्ट्रॅपी बॅकलेस फिटनेस गियर मध्ये दिसत आहे. ज्यात ती वर्कआऊट करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने वेटलिफ्टिंगचा इमोजी शेअर केला आहे. सोशल मीडियावर अपलोड केलेल्या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट सेशनमद्ये फायर आणि रेड हार्ट आयज इमोजी शेअर केले आहेत. एका चाहत्याने लिहिले की, “बॉलिवुडची सर्वात योग्य अभिनेत्री.” या व्हिडिओवर टायगर श्रॉफची (Tiger Shroff) प्रतिक्रियाही आली आहे.
दिशा पटानी तिच्या फिटनेस रुटीनबद्दल जागरूक आहे. तिचा हा ‘ट्रिपल किक’ व्हिडिओ पुरावा आहे. दिशाचा बेस्ट फ्रेंड टायगर श्रॉफ देखील फोटोवर कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. त्याने फायर इमोजीसह “क्लीन एएफ” लिहिले आहे.
दिशा पटानीचे वर्कआउटचे व्हिडिओ चाहत्यांची प्रेरणा वाढवण्याचे काम करतात. एकदा तिने एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती जबडा-ड्रॉपिंग रॅक पुल सेशन करताना दिसली. रॅक पुल ८० किलो होता, ज्यावर टायगर श्रॉफने तिला “वंडर वुमन” म्हटले. त्याची बहीण कृष्णा श्रॉफने लिहिले की, “फायर.” तिची इंस्टाग्रामवरही जबरदस्त फॅन फॉलोविंग पाहायला मिळत आहे. इंस्टाग्रामवर तिचे मिलियनमध्ये फॉलोअर्स आहेत.
दिशा पटानी तिच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच तिच्या व्यावसायिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असते. ती टायगर श्रॉफसोबत व्हेकेशनवर जात असते. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर दिशा पटानी शेवटची सलमान खानसोबत ‘राधे’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. आता ती लवकरच जॉन अब्राहम आणि तारा सुतारिया यांच्यासोबत एक ‘एक विलन २’ मध्ये दिसणार आहे. मोहित सुरी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. त्यासह तिचा पुढचा चित्रपट ‘योद्धा’ आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –