×

कडाक्याच्या थंडीत बोल्ड अवतारात दिसली दिशा पटानी, बिकिनी फोटोने पुन्हा वाढवले सोशल मीडियाचे तापमान!

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) आपल्या चित्रपटांसोबतच सोशल मीडिया पोस्टमुळे खूपच चर्चेत असते. आपले नवनवीन फोटो ती नेहमीच शेअर करत असते. या फोटोंमधील तिच्या अदांची आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याची सगळीकडेच चर्चा असते. आता पुन्हा एकदा तिच्या नवीन फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तिच्या या बोल्ड फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत.

हिंदी सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या आपल्या सोशल मीडियावरील फोटोंनी नेहमीच चर्चेत असतात. यांपैकीच एक नाव म्हणजे अभिनेत्री दिशा पटानी. आपल्या चित्रपटांइतकीच ती सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत असते. तिच्या फोटोंची चर्चा नेहमीच माध्यमांमध्ये देखील होत असते. आपल्या कसदार अभिनयासाठी लोकप्रिय असलेल्या दिशाचा सोशल मीडियावर भलामोठा चाहता वर्ग आहे. याच पार्श्वभूमीवर दिशाच्या नव्या फोटोंनी पून्हा एकदा सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे.

View this post on Instagram

A post shared by disha patani (paatni) 🦋 (@dishapatani)

दिशाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीवरून हे नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दिशा समुद्रकिनारी उभी असल्याचे दिसत आहे. त्यावेळी तिने खाली जमिनीकडे बघताना हा फोटो क्लिक केला आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावर पडलेल्या सूर्यकिरणांनी तिचे रूप खूपच मनमोहक दिसत आहे. फोटोमध्ये तिने क्रिम कलरची बिकिनी घातली आहे. सोबतच आपल्या मोकळ्या सो़डलेल्या केसांमुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडत आहे. ती सुट्टीसाठी फिरायला गेली असताना हा फोटो तिने शेअर केला आहे. सध्या या मोहक फोटोंवर तिचे चाहते फिदा झाले आहेत.

Photo Courtesy: Instagram/dishapatani

दरम्यान दिशा पटानी नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना दिसत असते. तिने २०२२ च्या नववर्षाची सुरुवात मालदीवमधून केली होती. यावेळी ती तिचा कथित बॉयफ्रेंड टायगर श्रॉफसोबत एकत्र फिरताना दिसली होती.

दिशा पटानी लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत (Sidharth Malhotra) ‘योद्धा’ चित्रपटात झळकणार आहे. याचबरोबर ती ‘विलन रिटर्न्स’ मधेही काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सुरी यांनी केले असून यामध्ये अर्जुन कपूर (Arjun Kapoor), जॉन अब्राहम (John Abraham), तारा सुतारिया (Tara Sutaria) यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा :

Latest Post