नवीन वर्ष सुरु झाले आणि कोरोनाचे संकटही थमु लागले. आता सर्व सुरळीत होणार असे वाटत असतानाच मनोरंजनविश्वासाठी मात्र हे वर्ष अतिशय दुःखद ठरत आहे. एकामागून एक अनेक दिग्गज कलाकार या जगाचा निरोप घेताना दिसत आहे. रमेश देव, लता मंगेशकर, बप्पी लहरी आदी अनेक कलाकारांचे यावर्षी निधन झाले आहे. आता मनोरंजनविश्वाला अजून एक धक्का बसला असून, एका युवा रॅपरचे नुकतेच निधन झाले आहे. रॅपर धर्मेश परमारने (Rapper Dharmesh Parmar) वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
रॅपर धर्मेश तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आणि लोकप्रिय होता. त्याने त्याच्या रॅपने तरुणाईला चांगलीच भुरळ घातली होती. धर्मेश एमसी तोडफोड (MC TodFod) या नावाने ओळखला जायचा. मूळचा मुंबईचा असणारा धर्मेश स्ट्रीट रॅपर्स ग्रुपमध्ये होता. शिवाय तो स्वदेशी नावाच्या सिंगिंग बँडचा तो भाग देखील होता. हिंदीसोबतच गुजराती रॅपसाठीही धर्मेश खूप प्रसिद्ध होता. झोया अख्तरच्या आणि रणवीर सिंगच्या ‘गली बॉय’ या चित्रपटाला साउंडट्रॅक आणि त्याला आवाज धर्मेशनेच दिला होता. ‘स्वदेशी’ बँडनेच धर्मेशच्या निधनाची बातमी सर्वांना दिली असून, त्याच्या कारचा अपघात झाल्याचे सांगितले आहे.
‘स्वदेशी बॅन्डने त्याच्या परफॉर्मन्सचा एक व्हीडिओ शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “‘तू कधी विसरला जाणार नाहीस, तू तुझ्या संगीतातून नेहमी जिवंत राहशील.’ धर्मेशच्या निधनाने त्याच्या चाहत्यांना आणि मनोरंजनविश्वाला मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावरून अनेकांनी त्याच्या आठवणी शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. धर्मेश परमार हा मुंबईतील प्रसिद्ध रॅपर होता. रॅप इंडस्ट्रीमध्ये तो अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय होता. त्याची सर्वच गाणी तरूणाईला नेहमीच आवडायची. त्याच्या रोपसोबतच तो त्याच्या स्टाइलची देखील ओळखला जायचा. मुख्य म्हणजे धर्मेशने रणवीर सिंगच्या ‘गली बॉय’ सिनेमासाठीही काम केले होते. या सिनेमातील साउंडट्रॅक बनवण्यासोबतच त्याने गायनही केले होते.
धर्मेशच्या रॅपिंग शैलीला ‘कॉन्शस रॅपिंग स्टाईल’ म्हटले जायचे. त्यांची गाणी लोकांच्या विचारांशी जोडली जायची. धर्मेशच्या कुटुंबाने नेहमीच त्याच्या कामाचे कौतुक केले. त्याने घरातील परंपरांना मोडून नवा मार्ग निवडल्याने घरातील लोक त्याचे कौतुक करायचे. धर्मेश राजीव दीक्षित यांना त्याचा आदर्श मानत असे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-