सध्या मराठी चित्रपट जगतात अनेक नाविण्यपुर्ण विषयांवर चित्रपट बनवण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. अनेक नवनवीन चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्ये सध्या चर्चा रंगलीये ती अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आणि आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) यांच्या चंद्रमुखी चित्रपटाची. प्रसिद्ध मराठी लेखक विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटात चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर, तर अभिनेता आदिनाथ कोठारे दौलत देशमाने या राजकारण्याची भूमिका साकारणार आहे. सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या आदिनाथ कोठारेने याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
अभिनेता आदिनाथ कोठारे सध्या त्याच्या आगामी चंद्रमुखी चित्रपटासाठी प्रचंड उत्साही आहे. याबद्दल बोलताना तो म्हणतो की, “मला जेव्हा प्रसाद ओकने (Prasad Oak) या चित्रपटाच्या माहितीसाठी बोलावले आणि कथा ऐकवली. तेव्हा मला मोठा धक्का बसला. मला चित्रपटाची कथा प्रचंड आवडली. तसेच यासाठी व्यायाम करण्याची गरज असल्याचेही मला प्रसादने यावेळी सांगितले. तेव्हापासून मी जिममध्ये वर्कआऊट करण्यास सुरूवात केली. या चित्रपटातील मी साकारणारी खासदार दौलत देशमानेही भूमिका अत्यंत भारदस्त आहे. तो प्रचंड प्रभावी नेता म्हणून प्रसिद्ध आहे. सगळेजण त्याच्या या व्यक्तिमत्वावर फिदा असतात. अशातच हा दौलत चंद्रा नावाच्या तमाशात काम करणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडतो.” त्यानंतर त्यांच्या आयुष्यात येणारी वादळे, संकटे आणि दोघांच्या प्रेमाची होणारी परीक्षा याची थरारक कथा चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचे त्याने यावेळी सांगितले.
या चंद्रमुखी कादंबरीबद्दल बोलताना तो म्हणाला की, “विश्वास पाटील यांची ही कादंबरी खूपच सुंंदर आहे. ती मी वाचणार होतो.” मात्र त्याला प्रसाद ओकने वाचू नकोस असे सांगितल्याचेही तो यावेळी म्हणाला. अमृतासोबत काम करण्याबद्दल बोलताना तो म्हणाला की, “मी आणि अमृता दोघेही प्रचंड मेहनती आहोत. तसेच ती खूप मेहनती अभिनेत्री आहे. पहिल्याच दिवशी आमच्यात घट्ट मैत्री झाली.” आता प्रेक्षकांना अमृता आणि आदिनाथच्या या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-