Sunday, March 22, 2026
Home मराठी ‘मन झालं बाजिंद’ मालिकेवर प्रेक्षकांची नाराजी, नव्या एन्ट्रीमुळे मालिका झाली ट्रोल

‘मन झालं बाजिंद’ मालिकेवर प्रेक्षकांची नाराजी, नव्या एन्ट्रीमुळे मालिका झाली ट्रोल

सध्या झी मराठीवर ‘मनं झालं बाजिंद’ मालिका चांगलीच चर्चेत येत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. मात्र मालिकेतील काही विषयांवर प्रेक्षकांची नाराजीही पाहायला मिळत आहे. मालिकेत प्रमुख भूमिका असलेल्या राया आणि कृष्णाच्या नात्यात नेहमीच काहीना काही दुरावा येतच असतो.  आता पून्हा एकदा मालिकेत नवीन वळण येणार असून यामध्ये दादासाहेबांची दमदार एंट्री होणार आहे. मात्र यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली असून या प्रोमोला जोरदार ट्रोल केल्याचे पाहायला मिळत आहे. 

झी मराठीवरील ‘मन झाल बाजिंद’ मालिका आता नव्या वळणावर आल्याचे दिसत आहे. कारण मालिकेत दादासाहेबांची म्हणजेच रायाचे आजोबा आणि भाऊसाहेब विधाते यांच्या वडीलांची एंट्री होणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये कृष्णा फुई आजीला दादासाहेबांच्या स्वभावाविषयी विचारत असल्याचे दाखवले आहे. स्वभावाने चांगले, मदतीला धावून जाणारे, वावगं काहीही न खपणारे अशी त्यांची ओळख फूई आजीने सांगितल्याचे या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र या मुळेच प्रेक्षकांनी निर्मात्यांना चांगलेच ट्रोल केले आहे.

प्रेक्षकांनी या ट्विस्टवर मालिकेला ट्रोल करताना आजपर्यंत नेमके कुठे होते? घर सोडून ते का गेले होते? असे प्रश्न विचारत “काहीही शिल्लक नाही म्हणून मालिका खेचायची चालली आहे” अशा शब्दात टीका केली आहे. तर काहींनी “ह्या सगळ्या आयडिया जुन्या झाल्या” असेही म्हणले आहे. एका नेटकऱ्याने यावर टीका करताना “आधी मी मालिका आवडीने पाहायचो, पण आता काहीही दाखवतात” असे म्हणत थेट नाराजी व्यक्त केली आहे. तर हे सगळे मालिका वाढवण्यासाठी सुरू आहे अशीही प्रतिक्रिया दिली आहे. यावरुन मालिकेवरील प्रेक्षकांची नाराजी थेट दिसत आहे. दादासाहेब विधात्यांच्या घरी आल्यावर राया आणि कृष्णाच्या नात्याला त्यांचा काय फायदा होणार, हे पाहणं आता रंजक ठरणार आहे. त्याचबरोबर ही नवीन भूमिका कोण साकारणार यांचीही प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा