Thursday, June 25, 2026
Home बॉलीवूड सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस थायलंडमध्ये केला साजरा

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस थायलंडमध्ये केला साजरा

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे एक बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. ते दोघे नेहमी सोशल मिडीयावर सक्रिय असतात. तसेच त्याचे नेहमी काॅमेडी रील्स व्हायरल होतात. याचे हे व्हिडोओ प्रेक्षकांना नेहमीच आवडतात. तर त्याचा नुकताच लग्नाचा वाढदिवस होता आणि त्यामुळे तो दिवस त्यानी उत्तम साजरा केला आहे, आणि त्यांचे फोटो त्यानी सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. तर या मध्ये असे दिसत आहे की, त्यानी ‘अमोरा बीच रिसॉर्ट फुकेत’मधील अनेक सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. आणि समुद्रकिनाऱ्यावरील या खास सेलिब्रेशनची झलक पाहायला मिळते.

या फोटोंमध्ये सोनाक्षी (Sonakshi) आणि झहीर एकमेकांच्या प्रेमात मग्न दिसत आहेत आणि समुद्राकाठी सूर्यास्ताचे सौंदर्य पाहत शांत क्षण घालवत आहेत. तसेच झहीर वाळूवर गुडघ्यावर बसून सोनाक्षीचा हात धरलेला या फोटो व्दारे दिसला आहे. तसेच त्यानी मॅचींग ड्रेस परीधान केले होते. दुसऱ्या एका फोटोमध्ये हे जोडपे समुद्रकिनाऱ्यावर एकमेकांना मिठी मारताना दिसत आहे आणि पार्श्वभूमीला समुद्राच्या लाटा उसळत आहेत; ते आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस मनसोक्त साजरा करत असल्याचे यात स्पष्टपणे जाणवते. तर हे फोटो पाहुन चाहते आता खुप शुभेच्छा आणि कौतुक करत आहेत.

सोनाक्षी आणि झहीर याच्या या नात्याची सुरुवात म्हणजेच त्यानी 23 जुन 2024 रोजी लग्न केले आणि त्यानी हा सोहळा त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय यांच्या समवेत साजरा केला. तसेच चित्रपटसृष्टीतील सहकलाकार मित्रासाठी एका रिसेप्शनचेही आयोजन केले होते. तसेच लग्नापूर्वी हे जोडपे सुमारे सात वर्षे एकमेकांच्या सोबत होते.

हेही वाचा

4 दिवसात कॉकटेल 2चा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ, 85 कोटी रुपयांचा गाठला टप्पा

हे देखील वाचा