Sunday, April 19, 2026
Home अन्य डेलीसोप क्वीन असणाऱ्या एकता कपूरने साईन केली मोठी डील, हॉलिवूड निर्मात्यांसोबत करणार हॉरर चित्रपटांची निर्मिती

डेलीसोप क्वीन असणाऱ्या एकता कपूरने साईन केली मोठी डील, हॉलिवूड निर्मात्यांसोबत करणार हॉरर चित्रपटांची निर्मिती

बॉलिवूड आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध निर्माती असलेल्या एकता कपूरची प्रोडक्शन कंपनी असलेल्या बालाजी मोशन पिक्चर्सने अरमान जोरेसच्या डार्क हेल आणि हॉलीवुड निर्माता स्टीवन श्नाइडर यांच्यासोबत काही चित्रपटांच्या निर्मितीचे एक डील साईन केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार या डील अंतर्गत हे तिघं मिळून हिंदी आणि इतर भाषांमध्ये मोठ्या संकल्पनेचे काही थ्रिलर आणि हॉरर चित्रपटांची निर्मिती करणार आहे. मात्र याबाबत अजून अधिक माहिती समोर आली नाही.

या डीलबद्दल एकता कपूरने सांगितले की, “बालाजी मोशन पिक्चर्सच्या माध्यमातून दर्शकांना काही चांगल्या कलाकृती दाखवणे आहे. मी या डिलमुळे खूपच उत्सुक आहे. मला विश्वास आहे की, मी भारतीय प्रेक्षकांसाठी उत्तमोत्तम कंटेंट घेऊन येईल. अशा संधी आम्हाला विस्तार करण्यासाठी मदत करतात. यासाठी तुमच्या विचारांची मदत होईल.

या डिलबद्दल जोरेसने सांगितले की, “बालाजी टेलिफिल्म्स मनोरंजनविश्वातील एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध नाव आहे. यांनी काळानुसार अतिशय उत्तम अशा कलाकृती बनवून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि आपले स्थान निर्माण केले. या डिलमुळे आम्ही देखील खूप आनंदित आहोत. आम्ही आता भारतीय भाषांमध्ये अधिक उत्तम कंटेंट देण्यासाठी तत्पर आहोत.” श्नाइडर यांनी सांगितले की, “ही डील माझ्यासाठी, आमच्यासाठी आमच्या टीमसाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे. भारतीय मनोरंजनविश्व हे त्याच्यात असणाऱ्या उत्तम कलाकृतींची ओळखले जाते आता आम्ही देखील असाच उत्तम कंटेंट देण्यासाठी बांधील असणार आहोत.”

पुढे श्नाइडर यांनी सांगितले की, “आम्ही निश्चितच त्या गोष्टींना समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्या लोकांना पाहायला आणि ऐकायला आवडतील.” श्नाइडर यांना पॅरानॉर्मल एक्टिविटी, ब्लेयर विच आणि स्प्लिट आदी उत्तम चित्रपटांसाठी ओळखले जाते तर प्रसिद्ध हॉलिवूड फिल्ममेकर जोरेस यांना गॉड इज डेड साठी ओळखले जाते, एकता कपूरने आतापर्यंत टीव्ही आणि चित्रपटांमध्ये अतिशय उत्तम कलाकृती तयार केल्या आहेत. ड्रीम गर्ल, द डर्टी पिक्चर, लिपस्टिक अंडर माई बुर्का आदी चित्रपटांसाठी तिला विशेष ओळखले जाते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा