राम चरण हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याच्या बाबतची प्रत्येक अपडेट चाहत्यांना जाणुन घ्यायची असते तर राम चरणच्या चाहत्यांसाठी एक आंनदाची बातमी आहे. पेड्डी चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान अभिनेता रामचरणचा अपघात झाला होता आणि तो आता बरा होत आहे. कोईम्बतूरमध्ये त्याच्या हातावर शस्त्रक्रिया झाली आहे. आणि आता तो बरा आहे. हि माहिती चाहत्यांपर्यत शस्त्रक्रियेनंतरचा राम चरणचा पहिला फोटो मधुन पोहचली आहे. त्यामुळे चाहते आता काळजी मुक्त आहेत.
राम चरण (charan)त्याच्या पेड्डी चित्रपटाचे चित्रकरण करताना एका आव्हानात्मक ऍक्शन करताना त्याला त्याच्या उजव्या मनगटाला गंभीर दुखावत झाल्याचे समजत आहे. या भागाच्या चित्रकरणा दरम्यान अनेक पैलवानही सहभागी होते. आणि त्यांनीही दुखापत होऊनही त्याने आपल्या कामाला प्राधान्य दिले. राम चरणला जास्त दुखापत झाल्याने पुढे कोणतीही शाररिक आडचण येवु नये यासाठी डॅाक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यासाठी सल्ला दिला. आणि आता अभिनेता रामचरण याचा सर्जरीनंतर डॉक्टरांसोबत फोटो व्हायरल होत आहे, 8 आठवडे आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
या पार पडलेल्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातील बेडवरून राम चरणचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. या फोटो मध्ये तो डाॅक्टरांच्या टिमसोबत हसताना दिसत आहे. आणि फोटो समोर येताच त्याच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. आणि अनेकांनी कंमेट करुन म्हणले आहे की, लवकर बरा व्होवो यासाठी शुभेच्छा असे अनेक चाहत्यानी त्याच्या अनेक प्रतिक्रिया देल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही राम चरणची शस्त्रक्रिया तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील गंगा रुग्णालयात करण्यात आली होती आणि ही शस्त्रक्रिया रुग्णालयाचे प्रमुख डॉ. एस. राजशेखरन यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रसिद्ध डॉक्टर डॉ. अलेसँड्रो बडिया आणि डॉ. प्रवीण भारद्वाज यांनी केली आहे.
हेही वाचा
‘लॉकअप 2’मध्ये तिसरे गुपित उघड करण्यासाठी का घाबरली आकांक्षा, घ्या जाणुन










