Thursday, July 30, 2026
Home टेलिव्हिजन हँडसम हंक सेझान खान अचानक का झाला गायब? पुन्हा जुन्हा चर्चाना उधान

हँडसम हंक सेझान खान अचानक का झाला गायब? पुन्हा जुन्हा चर्चाना उधान

काही मालिका संपल्यातरी त्या मालिका प्रेक्षकांच्या मनात राहतात. त्यातील कलाकार आणि कथा ह्या प्रेक्षक कधीच विसरु शकत नाहीत अशीच एक मालीका म्हणजे “कसौटी जिंदगी की”, हि मालिका 2000 साली आली होती. आणि एकता कपूर निर्मित हि मालीका त्या काळात अतिशय लोकप्रिय बनली. तसेच यातील अनेक कलाकार सुध्दा लोकप्रिय झाले. यातील अनुराग बसूच्या व्यक्तिरेखेने लाखो प्रेक्षकांना मोहित होते. त्याच्या सोबत काम करणारी अभिनेत्रीहि तिच्या अभिनयामुळे खुप प्रसिद्धीच्या झोतात आली आणि या मालीके नंतर तिने अनेक शो मध्ये काम केले. पण हा अभिनेता इतका प्रसिध्द होउन नंतर तो या क्षेत्रातुन गायबच झाला. पण राजा चौधरी याच्या वक्तव्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. 

अलिकडिल एका मुलाखती दरम्यान श्वेता तिवारीचा पती राजा (raja)चौधफेरीने त्यांच्या वैवाहिक जीवनातील अडचणी आणि श्वेताच्या अफेअरबाबत सांगितले त्याने असे दावे केले की, कसौटी जिंदगी की’ या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान श्वेता तिवारी आणि तिचा सह-कलाकार सेझान खान यांचे अफेअर होते. त्यांना त्याने अनेक वेळा रंगे हात पकडले आहे. आणि त्याच्या नाताबाबत त्याने सेझान खानशी बोलले, तेव्हा सेझानने उघडपणे हे नाते कबूल केले होते. आता राजा चौधरीच्या आरोपानंतर आता श्वेता तिवारी आणि सेझान खान यांच्या पुर्वीच्या नात्याबाबतची चर्चा पुन्हा रंगली आहे.

वैयक्तिक वाद आणि सुरुवातीच्या यशानंतर, सेजान खानने इंडस्ट्रीच्या झगमगाटापासून स्वतःला दूर ठेवले. या मालीकेनंतर काही मालीका मध्ये काम केले मात्र फार कमी प्रमाणात त्याने काम केले होते. मात्र तो आता एकांतप्रिय जीवन जगणे पसंत केले आहे. तो आता मुंबईत जीवन जगत आहे. आणि चांगल्या भुमिका मिळाल्या तर तो पुन्हा मालिका आणि चित्रपटांमध्ये दिसु शकतो.

अभिनंदन! गुरुपौर्णिमेच्या दिवशी करिष्मा तन्ना हिने दिला मुलाला जन्म

हे देखील वाचा