भोजपुरी इंडस्ट्रीत खेसारी लाल यादव (Khesari Lal Yadav) आणि पवन सिंग (Pavan Singh) यांच्यात ३६चा आकडा दिसतो. दोन्ही कलाकारांमध्ये बराच काळ तणाव सुरू असून, या तणावाने अनेकदा वादाचे रूपही घेतले आहे. मात्र आता या दोघांच्या चाहत्यांनीही खेसारी लाल यादव आणि पवन सिंग यांच्या लढाईत उडी घेतली आहे.
खरं तर, सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती स्वतःला पवन सिंगचा चाहता असल्याचे सांगत आहे. या व्हिडिओमध्ये पवन सिंगचा चाहता थेट खेसारी लाल यादव, तसेच त्याची पत्नी आणि मुलीला धमकावताना दिसत आहे. (pawan kumar fan threatened to khesari lal his wife and daughter)
स्वतःला पवन सिंगचा चाहता म्हणवणाऱ्या या व्यक्तीने सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो २ मिनिटांचा आहे. या व्हिडिओमध्ये तो खेसारी लालला शिवीगाळ करताना दिसत आहे. एवढेच नाही, तर खेसारी लालला पुन्हा रस्त्यावर लिट्टी चोखा विकण्यास भाग पाडणार असल्याचेही हा व्यक्ती बोलत आहे. या वादात खेसारी लाल यादवच्या पत्नी आणि मुलीला खेचत या व्यक्तीने मर्यादा ओलांडली. या व्यक्तीने अभिनेत्याची पत्नी आणि मुलीलाही खूप शिवीगाळ केली.
अगर मेरे परिवार के किसी भी सदस्य के साथ कुछ भी ग़लत होता है तो ज़िम्मेदार आप होंगे @bihar_police वालों।
ये निर्लज विडीओ बना के मेरे परिवार को धमकी दिए जा रहा है ।
बिहार के क़ानून व्यवस्था गुंडों के हाथ गिरवी रख दी गयी है क्या मुख्यमंत्री जी?? pic.twitter.com/padU7vs74C
— Khesari Lal Yadav (खेसारी) (@khesariLY) May 2, 2022
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर खेसारी लालने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे मदतीचे आवाहन केले आहे. ट्विटरवर त्या व्यक्तीचा व्हिडिओ शेअर करत अभिनेत्याने लिहिले की, “माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला काही झालं, तर याच्यासाठी बिहारचे पोलिस जबाबदार असतील. हा निर्लज्ज व्हिडिओ बनवून धमक्या देत आहे. बिहारची कायदा आणि सुव्यवस्था गुंडांच्या हातात गहाण पडली आहे का?”
मेरी @NitishKumar जी एवं @bihar_police से निवेदन है कि इस मानसिक विक्षिप्त और ज़हरीले इंसान पर ऐक्शन लें। गाली ही नही बल्कि मेरे बीवी और बेटी को रेप की धमकी दे रहा है।
मुझे उम्मीद है की मुझे न्याय मिलेगा और ऐसे ज़हरीले लोगों के ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई की जाएगी।
आपका
खेसारी pic.twitter.com/DptgM6R9GA— Khesari Lal Yadav (खेसारी) (@khesariLY) May 1, 2022
दरम्यान, खेसारी लालने आणखी एक ट्वीट केले होते, ज्यामध्ये त्याने या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्याने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, “मी नितीश कुमार जी आणि बिहार पोलिसांना विनंती करतो की, या मानसिकदृष्ट्या विकृत आणि विषारी व्यक्तीवर कारवाई करावी. शिवीगाळच नाही, तर त्याने माझ्या पत्नी व मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली. मला आशा आहे की, मला न्याय मिळेल आणि अशा विषारी लोकांवर कडक कारवाई केली जाईल. आपला खेसारी.”
हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेवर पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा