जगातील सर्वात मोठा फॅशन इव्हेंट आता लवकरच सुरू होणार आहे. ‘इन अमेरिका: ऍन अँथॉलॉजी ऑफ फॅशन’ या थीमसह यंदाचा मेट गाला अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात पार पडणार आहे. हा कार्यक्रम सुरू होण्याआधीच त्याच्या चर्चा जगभरात रंगल्या आहेत. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्हेनेसा फ्रीडमन, रेजिना किंग, ब्लेक लाइव्हली, रायन रेनॉल्ड्स, लिन-मॅन्युएल मिरांडा करणार आहेत.
या इव्हेंटमध्ये, आपल्याला दरवर्षी वेगवेगळ्या फॅशन डिझायनर्सनी डिझाइन केलेले कपडे पाहायला मिळतात, जे आपले आवडते सेलिब्रिटी परिधान करून रेड कार्पेटवर चालतात. दरवर्षी या इव्हेंटची थीम ठरवली जाते, त्यानुसार सेलेब्स गेटअप करतात. परंतु या थीमशिवायही या कार्यक्रमात अनेक नियम आहेत, जे सेलिब्रिटी कधीकधी तोडतात. चला जाणून घेऊया मेट गालाचे असे पाच नियम, जे प्रत्येकाने पाळले पाहिजेत आणि कोणत्या भारतीय स्टारने त्यांना तोडले आहे. (met-gala 2022 five strict rules celebrity guests need to follow at the event)
वयोमर्यादा
मेट गालाने आपल्या नियमांमध्ये वयोमर्यादेचा नियम समाविष्ट केला आहे. या नियमानुसार १९ वर्षांखालील लोकांना या फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी होण्यास मनाई आहे. इव्हेंटच्या प्रवक्त्याने या निर्णयाची पुष्टी केली की, “हा कार्यक्रम १८ वर्षाखालील लोकांसाठी योग्य नाही.”
सेल्फीवर बंदी
साल २०१५ पासून, कार्यक्रमात सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. प्रसिद्ध सेलिब्रिटींनी कार्यक्रमाचा बहुतांश वेळ फोनवर घालवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. सर्व सेलिब्रिटींना पाठवलेल्या नोटीसमध्ये, “फोटोग्राफी आणि सोशल मीडियासाठी फोन वापरण्यास परवानगी दिली जाणार नाही,” असे म्हटले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत अनेक सेलिब्रिटींनी हा नियम मोडला आहे. यामध्ये कायली जेनर (Kylie Jenner) आणि भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) यांचा समावेश आहे. २१७ मध्ये कायली आणि २०१८ मध्ये प्रियांकाने हा नियम मोडला होता.
धूम्रपानावर मनाई
बेला हदीद (Bella Hadid) आणि डकोटा जॉन्सन (Dakota Johnson) सारख्या सेलिब्रिटीज २०१७ मेट गालाच्या कार्यक्रमात बाथरूममध्ये धुम्रपान करताना दिसले. त्यानंतर, शोच्या सदस्यांनी निर्णय घेतला की, कार्यक्रमात धूम्रपान केले जाणार नाही. या कारणास्तव २०१८ मध्ये, “संग्रहालयात धूम्रपान करणे बेकायदेशीर आहे” असा नियम लागू करण्यात आला होता. तेव्हापासून मेट गालामध्ये धूम्रपान करण्यास मनाई आहे.
कांदा खाण्यास मनाई
मेट गाला कार्यक्रमात सहभागी झालेल्या सेलिब्रिटींना कॉकटेल आणि डिनर दिले जाते. परंतु या कार्यक्रमात कांदा आणि लसूण खाण्यास मनाई आहे, जेणेकरून तोंडातून घाण वास येणार नाही. याशिवाय सेलेब्सच्या कपड्यांवर काहीही पडू नये, म्हणून ब्रूसचेट्टा देखील दिला जात नाही.
सीटिंग अरेंजमेंट
वोगचे विशेष प्रकल्प संचालक, सिल्वाना वॉर्ड ड्युरेट यांनी सांगितले की, अनेक सेलिब्रिटींना त्यांची पावर आणि पोझिशन बसण्यासाठी वापरायची असते. कार्यक्रमात सेलिब्रिटी हेही पाहतात कीकोण कोणाच्या शेजारी बसेल, गेल्या वर्षी कोण कोणाच्या शेजारी बसले होते. अशा गोष्टी नोटीस करणे खूप धक्कादायक आहे, परंतु लोक ते करतात. त्यामुळे हे सर्व लक्षात घेऊन, सीटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे, जी कोणीही बदलू शकत नाही.
ैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा