Sunday, October 6, 2024
Home अन्य ‘मित्रांसोबत ‘तो’ फोटो शेअर करणे मंदिरा बेदीला पडले महाग’, सोशल मीडियावर झाली ट्रोल

‘मित्रांसोबत ‘तो’ फोटो शेअर करणे मंदिरा बेदीला पडले महाग’, सोशल मीडियावर झाली ट्रोल

सोशल मीडियावर कलाकरांना ट्रोल करणे ही खूपच सामान्य बाब झाली आहे. रोजच कोणता ना कोणता कलाकार ट्रोलर्सच्या निशाण्यावर येतो आणि त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जाते. आता सध्या ट्रोलर्सने अभिनेत्री मंदिरा बेदीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असलेली मंदिरा नेहमीच तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित पोस्ट शेअर करत असते. या पोस्टमुळे तिला मोठ्या प्रमाणावर लाइमलाइट देखील मिळते. मंदिराला अनेकदा विविध कारणासाठी ट्रोल केले गेले आहे, मात्र आता पुन्हा एकदा मंदिरा तिच्या एका पोस्टमुळेच ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

नुकताच मंदिराने तिच्या एका मित्रांसोबत तिचा एक फोटो शेअर केला असून, यावरून तिला मोठ्या प्रमाणवर ट्रोल केले जात आहे. झाले असे की, मंदिराने तिच्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली ज्यात तिने तिच्या मित्रासोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती आणि तिचा मित्र दोघेही स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. हा फोटो पोस्ट करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आदी, हा फोटोच सर्व काही बोलत आहे, की तू माझ्यासाठी किती महत्वाचा आहे. आपण एकमेकांना किती वर्ष झाले ओळखतो मी तुझ्यावर खूपच विश्वास ठेवते. तुला कामात खूप यश मिळो आणि तुझी प्रगत होवो. तुला खूप प्रेम.”

आता या पोस्टला घेऊन मंदिराला ट्रोल केले जात आहे. कारण ती तिच्या मित्राच्या खूपच जवळ उभी आहे. हेच काही लोकांना खूप खटकत आहे. या पोस्टवर सतत कमेंट्स येत आहे. एकाने लिहिलं, “हा तुझा नवीन नवरा आहे का?”, दुसऱ्याने लिहिले, “अरे काही काळापूर्वीच हिच्या पतीचे निधन झाले होते आणि ती दुखी होती. मग आता काय झाले.” या आशयाचा अनेक कमेंट्स या पोस्टवर येत असून, मंदिराला तिच्या नवऱ्याचे निधन झाल्याची आठवण करून दिली जात आहे.

तत्पूर्वी ३० जून २०२१ रोजी मंदिराच्या पतीचे हृदयविकाराच्या धक्क्याने अचानक निधन झाले. त्याचं निधनाचा मोठा धक्का मंदिराला बसला होता. त्या काळातही मंदिराला तिच्या कपड्यांवरून आणि तिच्या संस्कारावरून ट्रोल केले गेले. तिने दत्तक घेतलेल्या मुलीवरून देखील तिला ऐकवले गेले. याआधी देखील मंदिराला तिच्या लुक्सवरून कपड्यांवरून ट्रोल केले गेले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा