Sunday, June 22, 2025
Home बॉलीवूड धक्कादायक ! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा कोरोनामुळे मृत्यू, चाहत्यांमध्ये शोककळा

धक्कादायक ! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा कोरोनामुळे मृत्यू, चाहत्यांमध्ये शोककळा

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिव्या भटनागर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. दिव्या यांच्यावर मागील अनेक दिवसांपासून कोरोनाबाबत उपचार सुरू होते. त्यांच्या अकाली निधनामुळे टीव्ही क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

दिव्या यांना अनेक दिवसांपासून श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांची ऑक्सिजनची पातळी देखील कमी झाली होती. त्यात कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. व्हेंटिलेटरवर असलेल्या दिव्या यांनी आज वयाच्या ३४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

स्टार प्लसच्या ‘ये रिश्ता क्या केहलता हैं’ या मालिकेतून दिव्या यांनी टीव्ही क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर दिव्याने सेठजी, सिलसिला प्यार का, कभी हां कभी नां, कभी सौतन कभी सहेली, प्रीतो, श्रीमान श्रीमती फिर से आदी मालिकांमध्ये काम केले होते तर त्या सध्या सोनी सबच्या ‘तेरा यार हूं मैं’ मालिकेत काम करत होत्या.

Divya Bhatnagar
Divya Bhatnagar

दिव्या यांची मैत्रीण आणि टीव्ही कलाकार देबोलीना भट्टाचार्य हिने सोशल मेंदुवर पोस्ट करत दिव्याच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. ती लिहते, “जेव्हा कोणी कोणासोबत नसायचे,तेव्हा फक्त तू असायची. माझ्यासाठी तू एकमेव अशी व्यक्ती होती जिच्यावर मी चिडायचे, रुसायची, माझ्या मनातले बोलायची मात्र आता मी हे सर्व कोणसोबत करू. मला माहित आहे तुझ्या जीवनात तू अनेक कठीण प्रसंग झेलले किंबहुना झेलत होती. तरीही तू खुश असायची. पण आता तू अशा ठिकाणी आहेस जिथे तुला कोणीच फसवू शकत नाही, कोणी खोटे वागू शकत नाही तिथे तू आता फक्त आणि फक्त आनंदी राहा. तुला तर माहीतच आहे की, माझे तुझ्यावर किती प्रेम आहे. मी तुला कधीच विसरू शकत नाही. खूपच लवकर गेलीस तू. देव तुझ्या आत्म्याला शांती देवो.”

देबोलीना सोबतच दिव्याचा मित्र युवराज रघुवंशीने दिव्याच्या निधनाच्या बातमीला दुजोरा देत म्हटले, “दिव्याचे पहाटे ३ वाजता निधन झाले. दिव्याला गोरेगावच्या एसआरवी रुग्णालयातून सेव्हन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आले होते. रात्री अचानक दिव्याची तब्बेत बिघडली डॉक्टरांनी पहाटे ३ वाजता दिव्या गेल्याचे सांगितले. ही घटना आमच्यासाठी खुपच धक्कादायक आहे. देव तिच्या आत्म्याला शांती देवो.” दैनिक बोंबाबोंब कडूनही दिव्याला भावपूर्ण श्रद्धांजली.

हे देखील वाचा