Tuesday, April 21, 2026
Home अन्य ‘ ती तुमच्या मुलीच्या वयाची आहे..’ म्हणत व्हायरल फोटोमुळे नेटकऱ्यांनी बोनी कपूर यांना केले जोरदार ट्रोल

‘ ती तुमच्या मुलीच्या वयाची आहे..’ म्हणत व्हायरल फोटोमुळे नेटकऱ्यांनी बोनी कपूर यांना केले जोरदार ट्रोल

अबुधाबी येथे रंगलेल्या आयफा अवॉर्ड सोहळ्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. सिनेजगतातील रथी महारथींनी या शानदार पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. कलाकारांचा डान्स, कॉमेडीचा तडका, तर काही भावूक क्षण अशा अनेक कारणांनी हा कार्यक्रम प्रचंड गाजला. परंतु या कार्यक्रमात फोटो काढणे चित्रपट निर्माते बोनी कपूर (Boney Kapoor) यांना चांगलेच महागात पडले आहे. या व्हायरल फोटोमुळे ते नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

सध्या सोशल मीडियावर सर्वत्र हिंदी सिने जगतातील मानाचा समजल्या जाणाऱ्या आयफा अवॉर्ड सोहळ्याची चर्चा पाहायला मिळत आहे. सिने जगतातील दिग्गज कलाकारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. सध्या सर्वत्र या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यामध्ये बोनी कपूर यांच्या एका व्हायरल फोटोमुळे ते नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. हा फोटो बोनी कपूर यांनी ओटीटी अभिनेत्री आरती खोत्रपाल यांच्यासोबत काढला आहे. सेलिब्रेटी फोटोग्राफर वीरल भयाणीने हा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट केला आहे ज्यावर नेटकऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या फोटोमध्ये बोनी कपूर यांनी पांढरा पायजमा कुर्ता तर आरतीने थायवन पीस ड्रेस घातलेला दिसत आहे. पण या फोटोमुळे नेटकऱ्यांनी बोनी कपूर यांना चांगलेच धारेवर धरले आहे. या फोटोवर प्रतिक्रिया देताना एका नेटकऱ्याने “ती तुमच्या मुलीच्या वयाची आहे,” असे म्हणले आहे तर काही जणांनी त्यांना ‘म्हातारा’ म्हणत जोरदार टिका केली आहे. आरती छत्रपालच्या ड्रेसमुळे नेटकऱ्यांनी तिलाही चांगलेच ट्रोल केले आहे. दरम्यान निर्माते बोनी कपूर हे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे पती असून त्यांना जान्हवी, खुशी, अर्जुन, अंशुला अशी चार मुल आहेत. बोनी कपूर यांनी दोनवेळा लग्न केली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा