Friday, January 30, 2026
Home कॅलेंडर सुधीर मिश्रांच्या डोक्यावरून हरपलं मायेचं छत्र! पोस्ट करत म्हणाले, ‘आता मी अनाथ झालो…’

सुधीर मिश्रांच्या डोक्यावरून हरपलं मायेचं छत्र! पोस्ट करत म्हणाले, ‘आता मी अनाथ झालो…’

बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुधीर मिश्रा यांच्या आई दुर्गा देवेंद्रनाथ मिश्रा यांचे मंगळवारी (१४ जून) निधन झाले. याबाबत माहिती देताना सुधीर मिश्रा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर आगीसारखी पसरत आहे.

पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले की, “माझ्या आईचे एका तासापूर्वी निधन झाले आहे. ती आम्हाला कायमची सोडून गेली आहे. त्यावेळी मी आणि माझी बहीण माझ्या आईसोबत होतो. मी आता अधिकृतपणे अनाथ झालो आहे.” (filmmaker sudhir mishra mother passes away)

सुधीर मिश्रांच्या या पोस्टवर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रतिक्रिया देऊन त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करत आहेत. आयुष्मान खुरानापासून अमृता रावपर्यंत अनेक सेलिब्रिटी शोक व्यक्त करत आहेत. आयुष्मानने लिहिले की, “प्रिय सर स्वतःची काळजी घ्या. मनापासून शोक.” अमृता रावने ट्वीट केले, “आपण सर्व देवाची मुले आहोत, शेवटी आपण जिथून आलो आहोत, तिथे परत जातो.. तुमच्या आईला आनंद मिळो.”

मागच्या आठवड्यातच सांगितलं होतं, कशी आहे आई…
सुधीरने ७ जून रोजी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर केली आणि सांगितले होते की, त्यांच्या आईची प्रकृती चिंताजनक आहे आणि ती रुग्णालयात दाखल आहे. सुधीरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, ” मी आंघोळ करण्यासाठी हॉस्पिटलमधून बाहेर पडलो. मला थोड्या वेळाने पुन्हा हॉस्पिटलमध्ये जावे लागेल. डॉक्टर म्हणतात की, माझ्या आईकडे कमी वेळ आहे.”

सुधीर मिश्रा यांचे चित्रपट
सुधीर मिश्रा यांनी अनेक उत्तम चित्रपटांसाठी लेखन आणि दिग्दर्शनाचे काम केले आहे. ‘ये साली जिंदगी’, ‘रात गई बात गई’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘अर्जुन पंडित’, ‘तेरा क्या होगा जॉनी’, ‘खोया खोया चांद’ असे अनेक सिनेमे तुम्हाला आठवत असतीलच! हे सिनेमे सुधीर मिश्रांचे आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा