सध्या भोजपुरी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांमधील वातावरण तापलेले आहे. ते कलाकार म्हणजेच प्रसिद्ध अभिनेता खेसारी लाल यादव आणि अभिनेत्री काजल राघवानी. त्यांच्यामध्ये काही कारणास्तव वाद सुरू आहेत. दोघांनीही एकमेंकाशी बोलणं तर सोडाच, काम करणंही बंद केले आहे. नुकतेच एका मुलाखतीदरम्यान काजलने खेसारी लालवर तिची बदनामी करण्याचे आरोप लावले होते. परंतु असे असले, तरीही सध्या चाहत्यांना या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहायचे आहे. त्यामुळेच त्यांच्या एकत्र असणाऱ्या व्हिडिओला चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळत आहे. खेसारी लाल आणि काजलचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत काजल आणि खेसारी जबरदस्त परफॉर्मन्स करताना दिसत आहेत.
डान्सने इंप्रेस करत आहे काजल
खेसारी लाल आणि काजल राघवानी यांचे भोजपुरी ‘पागल बनाईबे’ या गाण्याचा व्हिडिओ यूट्यूबवर जोरदार धमाल करत आहे. हे गाणे खेसारी लालने प्रियांका सिंगसोबत गायले आहे. व्हिडिओमध्ये काजल राघवानीसोबत खेसारी लालची केमिस्ट्री खूपच शोभत आहे.
या गाण्यात काजलच्या डान्सने करोडो चाहत्यांना इंप्रेस केले आहे. ती ज्याप्रकारे आपली कंबर हलवत आहे, त्याने भले-भले डान्सर्सही मागे पडतील.
या गाण्याचे लिरिक्स आझाद सिंग यांनी लिहिले आहेत, तर संगीत धनंजय मिश्रा यांनी दिले आहे. गाण्याचे बॅकग्राऊंड म्युझिकही जबरदस्त आहे.
खरं तर खेसारी आणि काजल यांचे ‘पागल बनाईबे’ हे गाणे त्यांच्या भोजपुरी ‘दबंग सरकार’ या चित्रपटातील आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन योगेश राज मिश्रा यांनी यांनी केले होते. या व्हिडिओला आतापर्यंत २६ कोटींपेक्षाही अधिकवेळा पाहण्यात आले आहे. याव्यतिरिक्त ७ लाखांपेक्षा अधिक लाईक्स आणि ४७ हजारांपेक्षा अधिक कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
हे गाणे झी म्युझिक भोजपुरी या यूट्यूब चॅनेलवर १८ डिसेंबर, २०१८ रोजी रिलीझ करण्यात आले होते. विशेष म्हणजे, हे गाणे इतक्या वर्षांनीही चाहत्यांना आवडत आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-भोजपुरी गायक नीलकमल सिंगचं होळीवरील नवीन गाणं रिलीझ; इंटरनेटवर करतंय धमाल, पाहा व्हिडिओ
-रेकॉर्ड ब्रेक युट्यूबर अंकित यादवचा नवा विक्रम, ‘त्या’ गाण्याला मिळाल्या तब्बल ६४ कोटी हिट्स