Friday, April 25, 2025
Home भोजपूरी भोजपुरी गायक नीलकमल सिंगचं होळीवरील नवीन गाणं रिलीझ; इंटरनेटवर करतंय धमाल, पाहा व्हिडिओ

भोजपुरी गायक नीलकमल सिंगचं होळीवरील नवीन गाणं रिलीझ; इंटरनेटवर करतंय धमाल, पाहा व्हिडिओ

जवळपास सर्वांनाच ‘होळी’ हा सण आवडतो. अवघ्या काही दिवसांवर हा सण येऊन ठेपला आहे. परंतु त्यापूर्वीच आता होळीवरील भन्नाट भोजपुरी गाणे रिलीझ व्हायला सुरुवात झाली आहे. असेच एक गाणे आता नुकतेच रिलीझ झाले आहे. भोजपुरी गायक नीलकमल सिंग हे गाणे घेऊन आला आहे. चाहत्यांना हे गाणे भलतेच आवडले असून जबरदस्त व्हायरल होत आहे.

नीलकमल सिंगच्या या गाण्याचे नाव ‘यरवा रोवे पिचकारी धके’ असे आहे. त्याने आपल्या यूट्यूबवर हे गाणे अपलोड केले आहे. या गाण्याला एकाच दिवसात ४.५० लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

‘यरवा रोवे पिचकारी धके’ हे गाणे आशुतोष तिवारी आणि नीरज निर्दोषी यांनी लिहिले आहे. दुसरीकडे या गाण्याला छोटू रावत यांनी संगीत दिले आहे. गाण्याची परिकल्पना सोनू सुधाकर यांची आहे. दुसरीकडे म्युझिक व्हिडिओचे कोरिओग्राफर रितिक आरा आहेत. याचे दिग्दर्शन रवी पंडित यांनी केले आहे.

या गाण्याबद्दल बोलायचं झालं, तर याचे संगीत इतके चांगले आहे की, त्यामुळे ते श्रोत्यांच्या मुखात वेगाने येत आहे.

यापूर्वीही नीलकमलचे अनेक गाणे व्हायरल झाले आहेत. यामध्ये सर्वात अव्वलस्थानी ‘लइरा तोहरे के पापा कहता’ हे गाणे आहे. हे गाणेही नीलकमलने आपल्या यूट्यूबवर अपलोड झाले होते. या व्हिडिओला १४ कोटी व्ह्यूज मिळाले आहे.

या गाण्यात भोजपुरी अल्बमचे सर्वात प्रसिद्ध मॉडेल त्रिशा कर मधूने काम केले आहे. त्रिशा कर मधू भोजपुरीतील सर्वाधिक अव्वल गायकांची पहिली पसंत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा