Monday, June 23, 2025
Home बॉलीवूड आलिया बनणार आई, पण लवकर आत्याबाई होण्याच्या आनंदात ‘हे’ काय बोलून गेली रणबीर कपूरची बहीण, वाचा

आलिया बनणार आई, पण लवकर आत्याबाई होण्याच्या आनंदात ‘हे’ काय बोलून गेली रणबीर कपूरची बहीण, वाचा

सोमवारी (दि. २७ जून) कपूर खानदानाची लाडकी सून आणि प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट हिने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. आलियाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून प्रेग्नंसीबाबत माहिती देत सर्वांनाच सुखद धक्का दिला. यामुळे दोन्ही कुटुंबात आनंदाचे वातावरण झाले असून सर्वांनाच चिमुकल्या पाहुण्याच्या आगमनाची उत्सुकता लागली आहे. अशातच रणबीर कपूर याची बहीण आणि आलियाची ननंद रिद्धिमा कपूर हिला ही बातमी समजली. त्यानंतर तिने सोशल मीडियावर अशी काही पोस्ट केली की, ती आता जोरदार व्हायरल होत आहे.

रिद्धिमा कपूर हिची पोस्ट?
आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने आपल्या प्रेग्नंसीची (Alia Bhatt Pregnancy) घोषणा करताच, रिद्धिमा कपूर (Riddhima Kapoor) हिचा आनंद गगनात मावेनासा झाला. आत्या बनणार असल्याच्या आनंदात तिने सोशल मीडियावर अशी काही पोस्ट केली की, तिने सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधले.

Riddhima-Kapoor-Sahni
Photo Courtesy Instagramriddhimakapoorsahniofficial

रिद्धिमाने इंस्टा स्टोरीवर आलिया आणि रणबीर या दोघांचाही एक सुंदर फोटो शेअर केला. या फोटोला कॅप्शन देत रिद्धिमाने लिहिले की, “मेरे बेबी का अपना बेबी आने वाला है. मी तुमच्या दोघांवर खूप प्रेम करते.”

नीतू कपूर काय म्हणाल्या?
रिद्धिमापूर्वी नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनीही या बातमीवर त्यांची प्रतिक्रिया दिली होती. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. नीतू कपूर या रियॅलिटी शोच्या बाहेर स्पॉट झाल्या होत्या. त्यादरम्यान पॅपराजींनी नीतू यांना आजीबाई बनल्याच्या शुभेच्छा दिल्या, तेव्हा त्यांनी सर्वांना धन्यवाद दिला. यानंतर पॅपराजी म्हणाले की, “जुग जुग जिओ.” त्यावर नीतू कपूर यांनी त्यांना थांबवत म्हटले की, “नाही, आता शमशेरा आणि ब्रह्मास्त्र पण, आधी शमशेरा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla) 

आलिया आणि रणबीरचे लग्न
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर (Alia Bhatt And Ranbir Kapoor Marriage Date) यांचे लग्न यावर्षी १४ एप्रिल रोजी झाले होते. हे लग्न रणबीरच्या घरी झाले होते. यामध्ये दोन्ही कुटुंबातील व्यक्ती आणि जवळच्या व्यक्तींचा समावेश होता. मात्र, लग्नानंतर कामाला प्राधान्य देत हे कलाकार शूटवर पोहोचले होते. आता लग्नाच्या २ महिन्यांनंतर आलियाने दिलेल्या प्रेग्नंसीच्या बातमीने चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

आलियाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती शेवटची ‘आरआरआर’ या सिनेमात झळकली होती. आता तिच्या हातात अनेक सिनेमे आहेत. त्यामध्ये ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’, ‘तख्त’, ‘डार्लिंग्स’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा