Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड बॉलिवूडकरांवर संकट! सलमानच्या अभिनेत्रीचा जीव धोक्यात, मिळाली जीवे मारण्याची धमकी

बॉलिवूडकरांवर संकट! सलमानच्या अभिनेत्रीचा जीव धोक्यात, मिळाली जीवे मारण्याची धमकी

बॉलिवूडमध्ये असे कलाकार आहेत, जे त्यांच्या निर्भीड आणि बेधडक अंदाजासाठी ओळखले जाते. देशातील प्रत्येक मुद्द्यावर कलाकार आपली मतं मांडत असतात. कधीकधी त्यांचे हे वक्तव्य लोकांना आवडत नाही. त्यामुळे त्यांना टीकेचा सामनाही करावा लागतो. मात्र, हे टीकेपर्यंत सामान्य आहे. जर कलाकारांना जीवे मारण्याची धमकीच मिळाली, तर काय? नुकतेच बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर हिला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) हिला एक चिट्टी मिळाली आहे. या चिट्टीत तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हे धमकीचे पत्र मिळताच स्वराने लगेच स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली.

पोलिसांचा तपास सुरू
अभिनेत्री स्वरा भास्कर हिला एका पत्रात जीवे मारण्याची धकमी मिळाली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्याने म्हटले आहे की, हे पत्र अभिनेत्रीच्या वर्सोवा येथील घरी पाठवण्यात आले होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पत्र मिळाल्यानंतर स्वरा भास्करने २ दिवसांपूर्वी वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधला आणि अनोळखी लोकांविरुद्ध तक्रार नोंदवली. ते म्हणाले की, “तक्रारीच्या आधारे आम्ही अनोळखी व्यक्तींविरुद्ध एक गुन्हा दाखल केला आहे.” त्यांनी पुढे असेही सांगितले की, तपास अद्याप सुरू आहे.

काय लिहिले होते पत्रात?
अभिनेत्री स्वरा भास्कर हिला जीवे मारण्याची धमकी मिळालेल्या पत्रात वीर सावरकर यांचा उल्लेख होता. त्यात हिंदीत असे म्हटले होते की, “देशाचे युवा वीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाहीत.”

स्पीड पोस्टने आले होते धमकीचे पत्र
खरं तर स्वराला मिळालेले धमकीचे हे पत्र तिच्या जवळच्या स्पीड पोस्टामार्फत आले आहे. मात्र, आतापर्यंत स्वराला मिळालेल्या या धमकीमागील कारण समोर आले नाहीये. असे म्हटले जात आहे की, स्वराकडून मागील काही काळात वीर सावरकर यांच्याविरुद्ध करण्यात आलेले वादग्रस्त वक्तव्य या गोष्टीसाठी जबाबदार आहे.

स्वरापूर्वी या अभिनेत्यालाही मिळाली होती जीवे मारण्याची धमकी
विशेष म्हणजे, स्वरा भास्कर हिच्यापूर्वी बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) आणि त्याचे वडील सलीम खान (Saleem Khan) यांनाही असेच धमकीचे पत्र मिळाले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा