Friday, January 30, 2026
Home कॅलेंडर दुख:द! ‘लेके पहला पहला प्यार’ फेम दिग्गज अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

दुख:द! ‘लेके पहला पहला प्यार’ फेम दिग्गज अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नर्तकांपैकी एक असलेल्या शीला वाझ (Shiela Vaz) यांचे निधन झाले आहे. बुधवारी (२९ जून) वयाच्या ९०व्या वर्षी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईत गोव्यातील एका कॅथॉलिक कुटुंबात त्यांचा जन्म आणि संगोपन झाले. शीला वाझ यांच्यासाठी नृत्य क्षेत्रात प्रवेश करणे, विशेषतः भारतीय लोकनृत्य स्वीकारणे, हा सोपा प्रवास नव्हता. सिनेमात येण्याआधी त्यांना सुरुवातीला घरच्यांना खूप पटवावं लागलं. 

५० आणि ६०च्या दशकात शीला वाझवर चित्रित केलेली सर्वोत्कृष्ट गाणी
शीला वाझ १९५० आणि १९६०च्या दशकात अनेक सदाबहार गाण्यांवरील त्यांच्या उत्कृष्ट नृत्यासाठी ओळखली जातात. याच्यासोबत त्यांच्यावर ‘लेके पहला पहला प्यार’, ‘रमैया विशाल वैया’ आणि ‘घर आजा घेर आया बद्र सांवरिया’ यासह अनेक गाणी चित्रित करण्यात आली आहेत. जी आजही लोकांच्या जीभेवर असतात. (dancer shiela vaz passed away in mumbai)

अशाप्रकारे शीला वाझ यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत केले पदार्पण
त्यांनी प्रथम किशोर साहूच्या ‘मयूर पंख’मध्ये अभिनय केला. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ‘गुनाह’ (1953) हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि अशा प्रकारे शीला वाझ यांनी हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा