Monday, December 9, 2024
Home कॅलेंडर दहा वर्षात एकही हिट चित्रपट देऊ शकली नाही रिया चक्रवर्ती, सुशांत व्यतिरिक्त ‘या’ वादातही अडकलीय अभिनेत्री

दहा वर्षात एकही हिट चित्रपट देऊ शकली नाही रिया चक्रवर्ती, सुशांत व्यतिरिक्त ‘या’ वादातही अडकलीय अभिनेत्री

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूपूर्वी, रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हे नाव फार कमी लोकांनी ऐकले होते. त्याआधी रियाबद्दल इतक्या खोलवर कुणी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाच नव्हता. रिया चक्रवर्ती ही अभिनेत्याची गर्लफ्रेंड होती. त्यामुळे अंमली पदार्थ प्रकरणात सुशांतचे नाव आले, तेव्हा तिलाही अनेक आरोपांना सामोरे जावे लागले. पण, आता रियाची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता झाली आहे. फेब्रुवारीमध्ये ती जवळपास दोन वर्षांनी कामावर परतली. रिया चित्रपटांमुळे कमी, पण वादांमुळे जास्त चर्चेत राहिली. आज ही अभिनेत्री तिचा ३०वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला तिच्याबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत.

‘असे’ सुरू झाले करियर
रिया चक्रवर्तीचा जन्म 1 जुलै 1992 रोजी बंगळुरू येथे झाला. तिने 2009 मध्ये छोट्या पडद्यावरील एमटीव्ही रियॅलिटी शो ‘टीवीएस स्कूटी तीन दीवा’ मधून तिच्या करिअरची सुरुवात केली. ती या शोची विजेती होऊ शकली नाही, पण तिला उपविजेतेपद मिळाले. त्यानंतर ती एमटीव्हीचे अनेक शो होस्ट करताना दिसली. यानंतर रियाने ‘बँड बाजा बारात’साठी ऑडिशन दिले, पण ती रिजेक्ट झाली. (rhea chakraborty birthday interesting facts)

रियाचा पदार्पण चित्रपट
नशिबाने बॉलिवूडमध्ये साथ दिली नाही, तर रियाने दक्षिणेकडे मोर्चा वळवला. 2012 मध्ये तिचा तेलुगु चित्रपट ‘तुनिगा तुनिगा’ रिलीझ झाला होता. एका वर्षानंतर तिने ‘मेरे डॅड की मारुती’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दोन्ही चित्रपट विशेष काही करू शकले नाहीत. 2014 मध्ये, चारुदत्त आचार्य दिग्दर्शित आणि रमेश सिप्पी आणि रोहन सिप्पी निर्मित ‘सोनाली केबल’ देखील रियाच्या करिअरमध्ये फ्लॉप ठरला.

फ्लॉप ठरलेले चित्रपट
यानंतर 2017 मध्ये अभिनेत्रीने रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) आणि विवेक ओबेरॉयसोबत (Vivek Oberoy) नशीब आजमावले. बँक लुटीवर आधारित ‘बँक चोर’ या चित्रपटात ती दिसली होती. हा चित्रपटही फ्लॉप झाला. पुढच्या वर्षी २2017 मध्ये ती ‘जलेबी’ या रोमँटिक ड्रामा चित्रपटात दिसली. रिया चक्रवर्तीच्या कारकिर्दीतील हा चित्रपटही फ्लॉप ठरला. सुशांत सिंग राजपूत प्रकरणानंतर अभिनेत्रीचा अमिताभ बच्चनसोबतचा (Amitabh Bachchan) ‘चेहरे’ हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता, तोही फ्लॉप झाला होता.

महेश भट्टसोबतच्या संबंधांवर उठले प्रश्न
रिया चक्रवर्ती तिच्या आणि महेश भट्टसोबतच्या (Mahesh Bhatt) नात्यामुळे देखील चर्चेत राहिली आहे. रिया आणि महेश भट्टचे असे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते, त्यानंतर त्यांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित झाले. मात्र, या प्रकरणी रियाने सांगितले की, महेश भट्ट तिच्यासाठी वडिलांसारखे आहेत.

अधिक वाचा- 
अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर लग्न करणार? अभिनेत्री म्हणाली, ‘मी फक्त…’
पूनम पांडेच्या घायाळ करणाऱ्या अदा, फोटो पाहून चाहते फिदा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा