कोरोना व्हायरसमुळे लागलेल्या लॉकडाऊननंतर अनेकजण सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांनी भेट देत आहेत. यामध्ये कलाकारही मागे राहिले नाहीत. बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूदेखील आपल्या पतीसोबत सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी मालदीवला पोहोचली आहे. यादरम्यान तिने अफलातून फोटोशूट केले आहे. यातील फोटो आणि व्हिडिओ तिने आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवर शेअर केले आहेत. तिचा हा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना खूप भावला आहे. यासोबतच ते जबरदस्त व्हायरल होत आहेत.
बिपाशाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर मालदीवमधील समुद्रातील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत बिपाशाने ‘स्वर्ग’ असे लिहिले आहे. बिपाशाचे हे कॅप्शन पाहून असे म्हटले जाऊ शकते की, तिला मालदीप हे कोणत्याही स्वर्गापेक्षा कमी वाटत नाहीये.
या व्हिडिओत ती समुद्र किनाऱ्यावर एन्जॉय करताना दिसत आहे. यासोबतच ती समुद्रात डुबकी मारतानाही दिसत आहे. वर म्हटल्याप्रमाणे बिपाशा लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसत आहे. तिचे हे फोटो तिचा पती करणणे काढले आहेत.
खरं तर मालदीव हे बॉलिवूडमधील अनेकांचे आवडते ठिकाण आहे. काही दिवसांपूर्वीच शिल्पा शेट्टी मालदीवमधील व्हिडिओ शेअर केले होते. याव्यतिरिक्त काही सेलिब्रिटीही आपल्या कुटुंबासोबत या ठिकाणी फिरायला येतात.
बिपाशा बासूच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती शेवटची ‘अलोन’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ती आपला पती करण सिंग ग्रोवरसोबत मुख्य भूमिकेत होती. याव्यतिरिक्त ती आपल्या पतीसोबत सोशल मीडियावर नेहमी लाईव्ह येतानाही दिसते. तसेच सोबतचे फोटोही शेअर करतात.
बिपाशा बासूने सन २००१ मध्ये आलेल्या ‘अजनबी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार, बॉबी देओल, करिश्मा कपूर हे कलाकारही मुख्य भूमिकेत होते. याव्यतिरिक्त तिने सन २००२ साली ‘राज’ या भयपटात काम केले होते. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता.
तिने आतापर्यंत ‘जिस्म’, ‘राज ३’, ‘धूम २’ यांसारख्या चित्रपटातही काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अबब! उर्वशी रौतेलाचा ५० लाखांचा बोल्ड अँड ब्युटीफुल लुक, पाहा या लूकचे दोन खास व्हिडीओ