Friday, September 20, 2024
Home भोजपूरी दगाबाज मैत्री! सिनेमात काम देण्याच्या बहाण्याने भोजपुरी अभिनेत्रीवर बलात्कार, पोलिसात तक्रार दाखल

दगाबाज मैत्री! सिनेमात काम देण्याच्या बहाण्याने भोजपुरी अभिनेत्रीवर बलात्कार, पोलिसात तक्रार दाखल

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. दिल्लीजवळील गुरुग्राममधील एका भोजपुरी अभिनेत्रीला तिच्या इंस्टाग्रामवरील मित्राने मुलाखतीच्या बहाण्याने हॉटेलमध्ये बोलावले होते. तिथे त्या व्यक्तीने भोजपुरी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याची घटना घडवली आहे. पीडितेने या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केली आहे. त्यामुळे भोजपुरी सिनेसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी ही तरुणी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून महेश पांडे नावाच्या व्यक्तीसोबत बोलत होती. महेशने तिला भोजपुरी श्( Bhojpuri) सिनेमात काम करण्याची ऑफर दिली होती. 29 जून रोजी महेशने तिला मुलाखत घेण्याच्या बहाण्याने गुरुग्रामच्या उद्योग विहार भागातील एका हॉटेलमध्ये बोलावले होते.

ती खोली आरोपी महेशने आधीच बुक केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. तरुणीला काही प्रश्न विचारल्यानंतर महेशने अचानक दारूची बाॅटल घेतली आणि दारू पिण्यास सुरुवात केली. हे पाहून मुलगी खूप घाबरली होती. त्यामुळे ती तिथून उठली आणि पळून जाऊ लागली, आरोपी महेळने तिला पकडून तिच्यावर बलात्कार केला. विरोध केल्यावर आरोपींनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी तरुणीला दिली. तरुणीने बुधवारी पोलिसांत तक्रार केली आहे.

आरोपी महेश पांडे हा गुरुग्रामच्या चाकरपूर भागातील रहिवासी असल्याचे सांगण्यात जात आहे. सुभाष नावाच्या बनावट आयडीलवरून त्या आरोपीने हॉटेलमध्ये रूमही बुक केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. या प्रकरणी उद्योग विहार पोलिस ठाण्यात बलात्कार, धमकी देणे यासह अन्य कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत. ही घटना 29 जूनची आहे.

दरम्यान, या धक्कादायक घटनेने भोजपुरी सिनेजगातून आरोपीला अटक करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तसेच अशा प्रकारामुळे भोजपुरी इंडस्ट्री बदनाम होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कलाकारांनीही कोणत्याही व्यक्तीला भेटताना सावध राहिलं पाहिजे, असे सांगितले जात आहे. (A Bhojpuri actress was raped by her Instagram friend on the pretext of acting in a film)

अधिक वाचा- 
‘घर बंदूक बिरयानी’नंतर नागराज मंजुळेंची मोठी घोषणा, नव्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर
एकेवेळी ‘बीग्रेड’ सिनेमात काम करणाऱ्या मान्यताने संजय दत्तबरोबर संसार करून दाखवलाच

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा