Tuesday, May 21, 2024

केतकी चितळेच्या आयुष्यावर लवकरच प्रकाशित होणार पुस्तक; अभिनेत्रीने लोकांना केली ‘ही’ विनंती

मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय विवादित अभिनेत्री म्हणून केतकी चितळे प्रसिद्ध आहे. अनेक मराठी मालिकांमध्ये केतकीने काम केल आहे. तिने स्टार प्रवाहवरील ‘आंबट गोड‘ या मालिकेत आबोलीचे पात्र साकारले आहे. तिच्या या पात्राचे प्रक्षकांनी भरभरून कौतुक केले. केतकी नेहमीत तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत येते. शरद पवारांवर केलेल्या एका कवितेमुळे केतकीला जेलची हवा देखील खावी लागली होती.

सध्या अभिनयापासून लांब असलेली केतकी (Ketaki Chitale) सोशल मीडियावर मात्र सतत सक्रिय दिसते. अनेकदा ती विविध पोस्ट शेअर करत तिच्या उपस्थितीची जाणीव चाहत्यांना करून देते. ती सोशल मीडियावर सतत काही ना काही पोस्ट करत असते. तिच्या पोस्टवर नेटकरी कमेंटचा वर्षावच करत असतात. केतकी बोलली आणि वाद झाला नाही असे फार कमी वेळा होते.

नुकतेच केतकी इन्स्टाग्रामवर लाईव्हवर बोलत होती. त्यावेळी तिला नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न विचारले. यावेळी काही प्रश्नांची उत्तरे देन केतकीने टाळले. तर काही प्रश्नांची उत्तरे तिनी दिली आहेत. यावेळी केतकीने तिच्या आयुष्यावर आधारित एक पुस्तक प्रकाशित होणार असल्याचे सांंगितले. त्यांमुळे सध्या सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा सुरू आहे.

लाईव्ह चालू असताना केतकीला एका चाहत्याने विचारले की, ‘तुमची स्टोरी?’ यावर उत्तर देताना केतकी म्हणाली की, “पुढच्या वर्षी माझं एक पुस्तक प्रकाशित होणार आहे. ते तुम्ही नक्की खरेदी करा. त्यामध्ये माझं संपूर्ण आयुष्यातील किस्से तुम्हाला वाचायला मिळतील. माझ्यासोबत नेमक काय घडल होत? याविषयी त्यामध्ये सर्वकाही लिहिले आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती करते ते पुस्तक तुम्ही खरेदी करा. ” त्यामुळे आता केतकीच्या या पुस्तकात काय लिहिले असणार या विषयी चाहत्यांच्या मनात एक वेगळीच आस निर्माण झाली आहे.

अधिक वाचा- 
– गॉर्जियस नेहा धुपियाचे अतरंगी लूकमधील फोटोशूट व्हायरल, एकदा पाहाच
‘माझ्या डस्टबिनची पिशवी कोणी घेतली…’, भूमी काळ्या रंगाचा ड्रेस घालून झाली ट्रोल, युजर्सने उडवली खिल्ली

हे देखील वाचा