Tuesday, May 28, 2024

‘माझ्या डस्टबिनची पिशवी कोणी घेतली…’, भूमी काळ्या रंगाचा ड्रेस घालून झाली ट्रोल, युजर्सने उडवली खिल्ली

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर अभिनयापेक्षा तिच्या लूकमुळे जास्त चर्चेत असते. तिचा लूक कायमच चाहत्यांना खूप आवडतो. प्रत्येक वेळी ती तिच्या ड्रेसमुळे देखील चर्चेत असते. अशात शुक्रवारी (30 जुन)ला भूमी एका कार्यक्रमात गेली होती, जिथे ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पोहोचली. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये भूमी खूपच सुंदर दिसत होती, पण काही लोकांना तिचा लूक आवडला नाही आणि ते तिच्या ड्रेसची तुलना कचऱ्याच्या पॉलिथिनशी करू लागले. काय आहे नेमके व्हायरल व्हिडिओमध्ये? चला जाणून घेऊया…

शुक्रवारी (30 जुन)ला एका अवॉर्ड फंक्शनमध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकर (bhumi pedenkar) हिने उपस्थिती दर्शवली, ज्याचा एक व्हिडिओ साेशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये भूमी स्टाइलिश पाेज देताना दिसत आहे. मात्र, यावेळी अभिनेत्रीने परिधान केलेला ड्रेस युजर्सला आवडला नाही आणि ते अभिनेत्रीला माेठ्या प्रमाणात ट्राेल करू लागले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

भूमीला ट्राेल करत एका युजरने लिहिले की, ‘हे बेकार आहे, ना अभिनय ना चेहरा, फक्त दात मोठे आहेत’, तर दुसऱ्याने एकाने अभिनेत्रीला ट्राेल करत लिहिले, ‘घरातील पॉलिथिन कव्हर कसे संपले?’ अशात एकाने लिहिले, ‘ओये, माझ्या डस्टबिनची पिशवी काेण घेऊन गेलं?’

मंडळी अलीकडेच भूमी पेडणेकर तिचा बॉयफ्रेंड यश कटारियासोबत स्पॉट झाली होती. दोघेही विमानतळावरून एकत्र बाहेर पडताना दिसले. मात्र, कॅमेरा टाळण्यासाठी दोघंही आपापल्या गाडीत वेगळे-वेगळे पोहोचले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

भूमीच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचं झाले, तर भूमी शेवटची विकी काैशलसाेबत ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. अशात भूमी लवकरच अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. भूमीचे चाहते तिच्या पुढच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.(bollywood actress bhumi pedenkar trolled for her black dress )

आधिक वाचा- 
– ‘गदर 2’च्या प्रॉडक्शन हाऊसबाबत अमीषा पटेलचा मोठा खुलासा, केले ‘हे’ गंभीर आरोप
‘मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ’ फेम अभिनेत्रीने अचानक सोडली चित्रपटसृष्टी, जाणून घ्या काय करतेय सध्या?

हे देखील वाचा