पूजा हेगडेसोबत सेल्फी घेताना एका व्यक्तीने केलं ‘असं’ कृत्य, बघता बघताच व्हायरल झाला व्हिडिओ

पूजा हेगडे (Pooja Hegde) ही साऊथ सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. बॉलिवूड चित्रपटांमध्येही ती खूप सक्रिय आहे. तिचे व्हिडिओ अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतात. नुकतीच पूजा हेगडे मुंबईतील जिमबाहेर स्पॉट झाली होती. या दरम्यानचा तिचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये ती पॅपाराझींसमोर पोझ देताना दिसत आहे. पण यादरम्यान तिच्यासोबत असे काही घडते, ज्याची सध्या खूप चर्चा होत आहे.

चाहत्याने केले ‘असे’ काही
यावेळी पूजा हेगडे फोटोग्राफर्ससमोर पोझ देऊन बरेच फोटो क्लिक करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तेवढ्यात एक चाहता तिच्याजवळ येतो आणि सेल्फी काढू लागतो. पूजा सुद्धा हसत हसत सेल्फी घेते आणि तिच्या गाडीकडे चालायला लागते. त्यानंतर चाहता तिच्यासोबत आणखी सेल्फी घेण्यासाठी तिला विनंती करतो, अभिनेत्री नकार देते. तो चाहता पूजाच्या मागे मागे चालायला लागतो, तेव्हा फोटोग्राफर त्या व्यक्तीला ओरडायला लागतात. त्यानंतर तो तिथून निघून जातो. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. (a man forcibly tried to take a selfie with pooja hegde but she refused video viral)

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नेटकऱ्यांनी केली टिंगल
पूजा हेगडेचा हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानीने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यावर युजर्स मजेशीर कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले, “तू फोटो काय दिला, तो मागेच पडला.” दुसर्‍याने कमेंट केली, “तो पहिल्या फोटोत ब्युटी मोड ऑन करायला विसरला असे वाटते.” एकाने कमेंट केली, “प्रत्येकजण लो कॅमेरा क्वालिटीमध्ये वाईट दिसतो.” अशा प्रकारे नेटकरी त्या व्यक्तीची टिंगल करत आहेत. त्याचवेळी पूजा हेगडे खूप भाव खात असल्याचेही काही युजर्सचे म्हणणे आहे.

View this post on Instagram

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)

पूजा हेगडेचे चित्रपट
पूजा हेगडेचा लेटेस्ट चित्रपट ‘राधे श्याम’ गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला असून, त्यात तिने सुपरस्टार प्रभाससोबत (Prabhas) काम केले आहे. मात्र, हा बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. पूजा हेगडेने ऋतिक रोशनच्या (Hrithik Roshan) ‘मोहेंजो दारो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, परंतु हा चित्रपट कमाईच्या बाबतीत खास कामगिरी करू शकला नाही. आशुतोष गोवारीकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post