Tuesday, June 18, 2024

कंगना रणौत विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल, अभिनेत्रीच्या सोशल मीडिया पोस्ट सेन्सॉर करण्याची केली मागणी

अभिनेत्री कंगना रणौत (kangana ranaut) रोज नव्या अडचणीत सापडत आहे. नेहमीप्रमाणेच कंगनाच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. त्यामुळेच तिच्या ट्विटरवर बंदी घालण्यात आली असून, आता या अभिनेत्रीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. देशातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी भविष्यात त्यांच्या सर्व सोशल मीडिया पोस्ट सेन्सॉर करण्याची मागणी करण्यात आली आहे. कंगना तिच्या सोशल मीडिया पोस्ट आणि वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. कंगनाच्या पोस्ट कधी-कधी खूप आक्रमक असतात, त्यामुळे ती स्वतः कधी कधी तिच्या वक्तव्यांमुळे लोकांच्या द्वेषाची आणि कायदेशीर कारवाईची शिकार बनते.

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांची आठवण करून देणारी पोस्ट लिहिल्यानंतर तिला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे कंगनाने सांगितले होते. कंगनाने काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया जी यांनाही आवाहन केले आणि लिहिले की, “तुम्ही देखील एक महिला आहात, तुमच्या सासू इंदिरा गांधी जी यांनी शेवटच्या क्षणापर्यंत या दहशतवादाविरोधात जोरदार लढा दिला. कृपया तुमच्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना अशा दहशतवादी, विघटनकारी आणि देशविरोधी शक्तींकडून येणाऱ्या धमक्यांवर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश द्या.”

६ डिसेंबर रोजी होणार आहे सादर
दिल्ली विधानसभेच्या पीस अँड हार्मनी कमिटीने कंगनाला तिच्या सोशल मीडियावरील कथित द्वेषपूर्ण पोस्टबद्दल ६ डिसेंबरला समन्स बजावले आहे. समितीचे अध्यक्ष राघव चढ्ढा आहेत.

शेतीविषयक कायदे परत आल्याने नाराज झालेल्या कंगनाने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये खलिस्तानी दहशतवादी असा शब्द वापरला होता. त्यामुळे कंगनाने शेतकऱ्यांना खलिस्तानी संबोधून शीख समुदायाचा अपमान केल्याचा राग दिल्ली आणि मुंबईतील शीख समुदायात आहे. यानंतर कंगनावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

कंगना रणौत सतत घेत असते पंगा
बॉलिवूडची पंगा क्वीन कोणाशी ना कोणाशी पंगा घेतच असते. कधी राज्य सरकारशी, कधी प्रशासनाशी. तिच्या ट्विटर अकाऊंटवर बंदी घातल्यानंतरही तिने ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांच्याशी पंगा घेतला आणि त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. इतकंच नाही, तर तिच्या इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे सीईओ पदाचा राजीनामा दिल्यानंतर तिने जॅक यांची खिल्ली उडवली. ज्यावरून ती अजूनही त्यांच्याशी पंगा घेण्याच्या मनस्थितीत असल्याचे स्पष्ट होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही आता प्रियांका चोप्राच्या पतीसोबत लावणार ठुमके, मिळाली ‘ही’ आंतरराष्ट्रीय संधी

-जीवे मारण्याची धमकी मिळताच कंगना रणौतने वादामध्ये ओढलं सोनिया गांधींचं नाव, म्हणाली, ‘जीव देईन, पण…’

-‘गॅंग्स ऑफ वासेपुर’ फेम अभिनेत्याने उरकून टाकले लग्न, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला आनंदाचा धक्का!

हे देखील वाचा