मराठी मनोरंजनविश्वातील शाहरुख खान आणि रोमॅंटिक हिरो म्हणून सर्वात आधी नाव येते अभिनेता स्वप्नील जोशी याचे. अतिशय प्रतिभावान आणि हँडसम अभिनेता म्हणून त्याची मराठी आणि हिंदीमध्ये ओळख आहे. त्याने बालकलाकार म्हणून या क्षेत्रात पदार्पण केले आणि आज तो मराठी इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. स्वप्नीलचे व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असते. त्याचे दोन्ही आयुष्य प्रेक्षकांसमोर नेहमीच तो खुलेपणाने मांडत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे वैयक्तिक जीवन नेहमीच फॅन्स समोर येत असते. याच माध्यमातून तो अनेकदा त्याच्या दोन्ही मुलांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. त्याच्या मुलांना त्याने दिलेले संस्कार या व्हिडिओतून नेहमीच दिसतात.
आता पुन्हा एकदा स्वप्नील जोशीने त्याच्या मुलांचे काही फोटो शेअर केले आहेत. जे फोटो पाहून नेटकरी स्वप्नील जोशींचे कौतुक करताना थकत नाही. स्वप्नीलने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याचे दोन्ही मुलं दिसत आहे. त्याच्या मुलांना स्वप्नीलची बायको लीना देशप्रेम मनात रुजावे यासाठी एका सुंदर ठिकाणी घेऊन गेली होती. त्याच निमित्ताने त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
View this post on Instagram
स्वप्नीलने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “नुकतीच माझी मुलं डिफेन्स एक्झिबिशन पाहून घरी परतली. मुलांना त्या एक्झिबिशनला नेल्याबद्दल धन्यवाद लीना. ते घरी असल्यापासून प्रत्येक गोष्टीला जय हिंद म्हणत आहेत. आणखी काय पाहीजे ! त्यांच्यामध्ये देशप्रेम रुजवण्याचे आणि त्यांना आपल्या सैन्यातील जवानांच्या बलिदानाची आणि भारतावरील प्रेमाची ओळख करून देण्याचे हेच योग्य वय आहे! खऱ्या आयुष्यातील हिरोंना बघणे आणि सैन्याच्या टँकमध्ये बसणे या सर्व गोष्टींशी ते बांधले गेले आहेत. मला त्याचा खूप अभिमान वाटत आहे. जय हिंद!”
स्वप्निलच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्याचे कौतुक केले आहे. आपल्या मुलांना देशाबद्दल आणि देशाच्या इतिहासाबद्दल माहिती करून देण्यासाठी लीनाने उचलेल्या या पावलाचे सर्वच कौतुक करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘किसी का भाई किसी की जान’ला मिळणारा प्रतिसाद पाहून सलमान केले भावुक ट्विट म्हणाला…