Sunday, May 19, 2024

‘विजू मामांना तर मी क्षणाक्षणाला मिस करतो…’, मिलींद गवळींनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

टेलिव्हिजन जगतात सध्या ‘आई कुठे काय करते’ ही मालिका धुमाकूळ घालत आहे. यातील कलाकारांना प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळत आहे. सकारात्मक भुमिकांसह नकारात्मक भुमिकेला देखील चाहत्यांच्या वाहवा लुटत आहेत. मिलींद गवळी (Milind Gawali) देखील याला अपवाद नाहीत. ते सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. फोटो व्हिडिओ शेअर करून आपल्या भावना आणि मतं थेट चाहत्यांपर्यंत पोहचवत असतात. नुकतीच त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून, जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केली आहे.

मिलींद गवळी यांनी त्यांच्या अकाऊंटवरून फोटोंचा एक कोलाज केलेला व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात विजय चव्हाण, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, चेतन राव दळवी, अतुल परचूरे, मंगेश देसाई, समीर चौगुले, विशाखा सुभेदार, विजय पाटकर, योगिनी पोफळे, सुधीर जोशी, जनार्दन लवंगारे, भारत गणेशपुरे, मकरंद अनासपुरे, भरत जाधव इत्यादी कलाकार दिसत आहेत. या पोस्टच्या कॅप्शन चाहत्यांकडून खूप पसंत केलं जात आहे. (aai kuthe kay karate fame milind gawali share video)

कॅप्शनमध्ये मिलींद म्हणतायेत की, “हास्य रस नवरसांपैकी हा एक सुंदरसा रस. प्रत्येकाच्या जीवनामध्ये बाकीचे आठ रस किती महत्त्वाचे आहेत मला माहिती नाही , पण हा रस खूपच महत्त्वाचा आहे. हास्यरस जर आपल्या जीवनामध्ये नसेल तर मला असं वाटतं या जीवनाला काहीच अर्थ उरत नाही. जगण्यासाठी नवरसांपैकी हास्य रस खूप म्हणजे खूपच महत्त्वाचा आहे .ज्याच्या कोणाच्या आयुष्यामध्ये हा रस कमी असेल तर एक वॉर्निंग warning समजावी आणि लगेच हास्य रस आपल्या आणि इतरांच्या आयुष्यामध्ये आणायचा प्रयत्न करावा.”

“मी बरेच वेळा सांगितले की मी खूप नशीबवान आहे त्याचं कारण माझ्या आयुष्यामध्ये हास्यरस तर आहेच पण असे अनेक लोक माझ्या आयुष्यात आहेत जे हास्यरस निर्माण करतात, हजारो-लाखो लोकांना ते खळखळून हसायला भाग पडतात , सध्या ते काम माझा सांगलीचा जीवश्चकंठश्च मित्र वसंतराव हंकारे @_vasanthankare करत आहे ,तो वीर रसापासून हास्यरसा पर्यंत सगळेच रस तो आपल्या युवकांपर्यंत पोचवत आहे.”

पुढे त्यांनी लिहिलं की, “माझ्या आयुष्यात हास्यरस निर्माण करणारे अनेक आले, त्यात विजू मामा चव्हाण, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक मामा सराफ, चेतन राव दळवी, आतुल परचूरे, मंगेश देसाई, समीर चौगुले, विशाखा सुभेदार, विजय पाटकर, योगिनी पोफळे, सुधीर जोशी, जनार्दन लवंगारे, भारत गणेशपुरे, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, किती किती नाव घेऊ मी! आणि सगळ्यात सुपर टॅलेंटेड super Talented म्हणजे सतीश तारे कम्प्लीट वेडा माणूस होता, तो कॉमेडीचा बादशाहच, मी किती भाग्यवान आहे मला या सगळ्या हास्यसम्राटांन बरोबर काम करायला मिळालं , तुम्ही कल्पनाच करू शकणार नाही की मी माझ्या या सिनेमाच्या प्रवासामध्ये किती हसलो असेन यांच्या सानिध्यात. विजू मामा ना तर मी क्षणाक्षणाला मिस miss करतो विजू मामा आणि लक्ष्मीकांत बेर्डे एकत्र आले कि जो काय आहे हायदोस घालायचे,
बारं ते कोणालाच सोडायचे नाहीत. मग मला कसं सोडलं असेल. Miss you’ll Very Much. जे आता आपल्या नाहीत , ते नक्कीच देवांना हसवत असतील. हास्य सम्राटचं होते ते सगळे.”

चाहत्यांकडून या पोस्टला खूप प्रेम मिळत आहे. ‘खूप छान लिहिलंय सर’ असं म्हणत नेटकरी मिलिंद गवळींचं तोंडभरून कौतुक करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा