Sunday, June 4, 2023

केतकी चितळेचे शेजारच्यांशी वागणे कसे होते? सोसायटीतल्या लोकांनी जे सांगितलंय ते पाहून म्हणाल, ‘सगळंच अवघड आहे’

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह कविता पोस्ट केल्या प्रकरणी तुरुंगात असलेले मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिच्याबद्दल आता एक खास माहिती समोर येत आहे. केतकीच्या घराशेजारी राहणाऱ्या रहिवाशांनी तिच्याबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत.

शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकी चितळे हिच्या विरोधात आतापर्यंत १५हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच, सध्याही ती तुरुंगात आहे. केतकीच्या पोस्टमुळे संपूर्ण राज्यात एकच वाद निर्माण झाला. यात अनेकांनी तिची पोस्ट वाचून तिला संस्कार, वागणूक याबाबत चांगले धडे दिले. यातच आता केतकी चितळे हिच्या सोसायटीत राहणाऱ्या सदस्यांनी तिची तिथे वागणूक कशी होती, याबाबत सांगितले आहे.

सध्या केतकी चितळे राहत असलेल्या सोसायटीतील शेजाऱ्यांनी तिच्या वागणूकबद्दल अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार केतकीकडे ज्या कंपनीचे लोक फूड डिलिव्हरीसाठी येत असत त्यांच्याशी देखील तिचे अनेकदा खटके उडायचे. तसेच, केतकी राहत असलेल्या रोडपाली परिसरातील सोसायटीतील रहिवाश्यांनीही तिचे अनेकदा सोसायटीतील लोकांशी वाद होत असायचे, असे म्हटले आहे.

तसेच, ती शेजारी राहणाऱ्यांशी अधिक बोलत नसे किंवा अनेकदा त्यांच्यात खटके उडायचे. यात सोसायटीच्या अनेक निर्णयांनाही तिने विरोध केला आणि ज्या मिटिंगमध्ये ती नसायची त्या मिटिंगमधील निर्णयाला नेहमीच विरोध करायची, असे काही शेजारच्यांनी म्हटले आहे. एका चॅनलले घेतलेल्या मुलाखतीतून हा उलगडा झाला आहे.

सध्या केतळी कुठे?

सुरुवातीला केतकी चितळेला नवी मुंबईतील कळंबोली पोलिसांनी अटक केली. त्यानंतर ठाणे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. ठाणे कोर्टाने केतकीला तीन दिवासांची पोलीस कोठडी दिली. पोलीस कोठडी संपताच केतकीला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने तिला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावाली. मात्र, याच्या दुसऱ्याच दिवशी केतकीचा ताबा नवी मुंबईतील रबाळे पोलिसांनी एका जुन्या अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात घेतला आहे. यात कोर्टाने तिला पुन्हा पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.

( Actress Ketki Chitale And Her Neighbors In Mumbai )

अधिक वाचा

केतकी चितळेच्या अडचणींमध्ये अधिक वाढ, ठाणे सत्र न्यायालयाने केली आणखी एक मोठी घोषणा

‘मराठी कलाकारांनी असं वागणं खूप लज्जास्पद आहे’, मानसी नाईकची केतकी चितळेच्या पोस्टवर प्रतिक्रिया

‘मी पोस्ट डिलीट करणार नाही’, म्हणत केतकी चितळेने न्यायालयात स्वतः मांडली बाजू

हे देखील वाचा