बॉलिवूडचा ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा आमिर खान सर्वच बाबतीत परिपूर्णतेसाठी ओळखला जातो. त्याची मुलगी इरावरसुद्धा आपल्या वडिलांचा प्रभाव पडल्याचे जाणवते. म्हणूनच तीसुद्धा कोणत्याही गोष्टीत, कसलीही कसर सोडत नाही. तिच्या स्वत: च्या अलीकडील आव्हानांवरून असेच दिसतू आहे.
शनिवारी (८ मे) आपला वाढदिवस साजरा करणाऱ्या इरा खानने, तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, ‘४आठवडे, ७ दिवस, २५ मिनिटे. मी हे करू शकते का? काही फरक पडत नाही की, मला किती भावनिक वाटत आहे. मी हे माझ्यासाठी करू शकते?’ व्हिडिओमध्ये इरा तिच्या वर्कआउटबद्दल बोलत आहे.
इरा खानने स्वत: ला एक महिनाभराचे, कठोर कसरतीचे आव्हान दिले आहे. पुरावा देण्यासाठी, ती दररोज इंस्टाग्रामवर पोस्ट्स शेअर करेल. व्हिडिओमध्ये तिने सांगितले की, ‘मी 23 वर्षांची झाली आहे. आणि स्वत: मला लठ्ठ झाल्याचे जाणवत आहे.’ तसेच तिने स्वत: सांगितले की, ती खूप जंक फूड खाते. म्हणून तिने वर्कआउट करण्याचा दृढनिश्चय केला आहे.
इराचा प्रियकर नुपूर शिखरे एक फिटनेस ट्रेनर आहे. त्याने आमिर खानलाही फिट केले आहे, आणि आता तो इराला मदत करणार आहे. या दोघांचे वर्कआऊट करणारे फोटोदेखील यापूर्वी व्हायरल झाले आहेत. इराने आपल्या आयुष्याचा निर्णय स्वत: घेण्याचे ठरवले आहे.
इराच्या या पोस्टवर बॉलिवूड कलाकारही कमेंट करत आहेत. हेझल कीचने तिला स्वत: वर जास्त वजन न ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तिने लिहिले की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा गोड मुली. स्वत: चे काहीतरी तयार करण्यासाठी, स्वतःवर जास्त दबाव आणू नको. मी या रूपातही तुझ्यावर प्रेम करते.” याखेरीज नुपूर शिखरेनेही यावर भाष्य केले आहे. त्याने ‘खेळ सुरू,’ असे लिहिले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मातृदिनानिमित्त अमिताभ बच्चन यांनी शेअर केला चिमणीचा व्हिडिओ, सांगितले आईचे महत्त्व
-‘तू एक हिरो आहेस’, अभिनेत्री सारा अली खानने केलेल्या ‘या’ कामामुळे सोनू सूदेकडून प्रशंसा
-ढोल ट्विस्टसोबत व्हायरल झाले रवीना टंडनचे ‘टिप टिप बरसा पाणी’ गाणे, अभिनेत्रीनेही व्हिडिओ केला शेअर