Saturday, June 15, 2024

‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ खेळणार विश्वनाथन आनंदसोबत बुद्धिबळ; मिळालेला पैसा कोव्हिड निधीसाठी

बॉलिवूडमध्ये ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ अशी ज्याची ओळख आहे तो म्हणजे अभिनेता आमिर खान. खरं तर हे नाव त्याला त्याच्या कामातील परफेक्शनमुळे मिळाले आहे. त्याचे कोणतेही काम असो. त्या कामाचा सारासार विचार करून ते तो करत असतो. चित्रपट असो किंवा त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील काही दुसरे काम असो. तो ते पूर्ण योजनेनुसार करत असतो. त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनबाबत देखील तो वेगवेगळे फंडे वापरत असतो.

खरं तर आमिर खानचा एखाद दुसरा अपवाद वगळता बाकी सगळेच चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. तो वर्षाला 4-5 चित्रपट नाही, तर 4-5 वर्षातून एक चित्रपट करतो. पण तो चित्रपट बाकी सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडून जातो. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देखील त्याने वेग- वेगळ्या कल्पना वापरून प्रमोशन केले आहे. अगदी छोट्या पडद्यावरील ‘सत्यमेव जयते’ हा शो देखील त्याने खूप चांगल्या प्रकारे केला होता.

आमिर खानचा आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचे काम थोडक्यात संपत आले आहे. अशातच त्याने प्रमोशन मोड चालू केलेला दिसत आहे. याचे कारण म्हणजे तो चेस म्हणजेच बुद्धिबळ खेळणार आहे. तेही ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांच्यासोबत. यामध्ये इतर सेलिब्रिटींचाही समावेश असणार आहे. त्यात आमिरसह किच्छा सुदीप, रितेश देशमुख, गायक अरिजीत सिंह, गायक-गीतकार अनन्या बिर्ला, क्रिकेटपटू युझवेंद्र चहल, झिओमी इंडियाचे एमडी मनु कुमार जैन, झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ, निर्माता साजिद नाडियाडवाला आणि आपुप्र पदकंनाय यांचा समावेश आहे.

त्याचा हा सामना येत्या 13 तारखेला संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. ही स्पर्धा भारतीय अधिकृत यूट्यूब चॅनल चेस डॉट कॉमवर लाईव्ह दाखवली जाणार आहे. या उपक्रमाला ‘चेकमेट कोव्हिड’ असे नाव देण्यात आले आहे. यातून मिळणारे पैसे कोव्हिडसाठीचा निधी म्हणून वापरला जाणार आहेत. ज्यामुळे देशातील कोरोना रुग्णांना मदत होऊ शकते आणि ही दुसरी लाट फेटाळून लावण्यात मदत होईल. याची माहिती ट्विटरवरून दिली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-या चिमुकलीला ओळखलं का? आज तिच्या ‘कॉमिक टायमिंग’साठी आहे प्रसिद्ध; तर प्रेक्षकांना पोट धरून हसायला पाडते भाग

-प्रेग्नंसीच्या वृत्तांमध्ये समोर आला अभिनेत्रीचा बेबी बंपसोबतचा पहिला फोटो; ६ महिने गरोदर असल्याचा दावा

-‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार यांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज; नेहमीप्रमाणेच सायरा बानो यांची होती त्यांना साथ

हे देखील वाचा