Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड ‘म्हणून मी बॉलिवूडच्या पार्ट्यांना जात नाही’, अभिनेता आमिर खानने पहिल्यांदाच केला खुलासा

‘म्हणून मी बॉलिवूडच्या पार्ट्यांना जात नाही’, अभिनेता आमिर खानने पहिल्यांदाच केला खुलासा

आमिर खान (Aamir Khan) हा हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि भूमिकांनी त्याने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयाइतकाच तो त्याच्या शिस्तप्रियतेसाठीही विशेष ओळखला जातो. बॉलिवूड अभिनेता आमिर खान अवॉर्ड शो आणि फिल्म पार्ट्यांपासून दूर राहतो. आमिर खानही सोशल मीडियापासून लांब दिसतो. त्यांना त्यांच्या लोकांसोबत राहण्याचा आनंद मिळतो. मात्र आमिरने बॉलिवूड पार्ट्यांपासून दूर का ठेवले आहे. याचाच खुलासा त्याने अलिकडेच करण जोहरच्या कार्यक्रमात केला आहे. 

बॉलिवूड निर्माता करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रम चांगलाच चर्चेत असतो. कार्यक्रमात सिने जगतातील अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावताना दिसत असतात. लवकरच या कार्यक्रमात अभिनेता आमिर खान सहभागी होणार आहे. यामध्ये आमिर खान त्याच्याबद्दलचे अनेक खुलासे करताना दिसणार आहे.यापैकी एक आमिर बॉलीवूड पार्ट्यांमध्ये न जाण्याबद्दल असेल. आमिर खान बर्‍याचदा पार्ट्यांमध्ये एका कोपऱ्यात शांत बसताना दिसतो. याबाबत विचारले असता

आमिर खान म्हणाला की,  पार्ट्यांमध्ये संगीत खूप जोरात असते. लोक त्या मोठ्या आवाजात बोलण्याचा प्रयत्न करत असतात. आमिर खानच्या या उत्तरावर, करीना कपूर खानने खुलासा केला की आमीर सहसा पार्टीमध्ये त्याचे शॉट घेतो आणि त्याच्या हिंदी गाण्यांवर नाचतो. करिनाने असेही सांगितले की, जर पार्टीत 200 लोक असतील तर आमिर खान उलट दिशेने जातो.

करण जोहरने आमिर खानला त्याच्या शोमध्ये रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर त्याची प्रतिक्रिया विचारली. प्रत्युत्तरात आमिरने रणवीर सिंगचे कौतुक केले. आमिर खान म्हणाला- होय, मी ते फोटो पाहिले आहेत. त्याची शरीरयष्टी खूप चांगली आहे. मला वाटतं रणवीरचं हे खूप धाडसी पाऊल होतं. करण जोहरच्या चॅट शोमध्ये आमिर खानने त्याचे चित्रपट, माजी पत्नी आणि मुलांसोबतचे नाते याबद्दल बोलले.

आमिरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर त्याचा लाल सिंग चड्ढा हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू आहे. या नकारात्मक वातावरणात आमिरने लोकांना त्याचा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा –

‘अभिनेत्री असली तरी संस्कार का विसरु?’ पतीची पूजा केल्यानंतर ट्रोल झालेल्या अभिनेत्रीने सुनावले खडेबोल

‘या’ एका व्यक्तीने घोळ घातला नसता तर; मन्नतचा मालक सलमान खान असता, खुद्द भाईजानने केला खुलासा

‘तुम्ही चेहऱ्याची प्लॅस्टिक सर्जरी केलीय का?’ शेवटी अमृता फडणवीसांनी खुलासा केलाच

हे देखील वाचा