Tuesday, March 19, 2024

‘लालसिंग चड्ढा’च नव्हे, आमिर खानचे ‘हे’ चित्रपटही आहेत हॉलिवूडची सेम कॉपी

आमिर खान (Aamir Khan) हा हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि आव्हानात्मक भूमिकांनी तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपली प्रत्येक भूमिका प्रभावीकरणे आणि त्यात जिवंतपणा आणणे यासाठी आमिर खानचे नेहमीच कौतुक केले जाते. आपल्या अभिनय कारकिर्दित एकापेक्षा एक सुपरहीट चित्रपट करणारा आमिर खान चार वर्षानंतर लालसिंग चड्ढा चित्रपटात झळकणार आहे.  हा चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. हॉलिवूड रिमेक चित्रपटात काम करण्याची आमिर खानची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने अनेक रिमेक चित्रपटात काम केले आहे. 

अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या लालसिंग चड्ढा चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी होऊ लागली आहे. याचे कारण म्हणजे चित्रपट हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे असे सांगितले जात आहे. परंतु हॉलिवूड चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये काम करण्याची आमिर खानची ही पहिली वेळ नाही.पाहूया आमिर खानच्य या चित्रपटांची यादी…

दिल है के मानता नहीं (1991)
महेश भट्ट दिग्दर्शित ‘ऐ दिल है के मानता नहीं’ या चित्रपटात आमिर खान आणि पूजा भट्ट यांनी उत्तम काम केले आणि हा चित्रपटही खूप यशस्वी ठरला. हा चित्रपट हॉलिवूडच्या ब्लॉकबस्टर ‘इट हॅपनड वन नाईट’चे रिमेक असल्याचे मानले जाते.

जो जीता वही सिकंदर (1992)
आमिर खानच्या सर्वात मोठ्या यशस्वी चित्रपटांपैकी एक, जो जीता वही सिकंदर हा १९७९ च्या हॉलिवूड चित्रपट ब्रेकिंग अवेनेवर आधारित असल्याचे म्हटले जाते. मन्सूर खान यांनी आमिरच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, ज्यात दीपक तिजोरी, आयेशा जुल्का आणि पूजा बेदी यांच्याही भूमिका होत्या.

हम हैं राही प्यार के (1993)
आमिर खानने महेश भट्टच्या या चित्रपटासाठी लेखनासाठी सहकार्य केले, हम हैं राही प्यार के हा 1958 च्या हॉलीवूड ब्लॉकबस्टर हाउसबोट रिमेक होता.

मन (1999)
मन हा चित्रपट इंद्र कुमार यांनी दिग्दर्शित केले होते आणि आमिर खान, मनीषा कोईराला आणि अनिल कपूर यांच्या कामाचे खूप कौतुक झाले. हा चित्रपट 1957 च्या हॉलिवूड ब्लॉकबस्टर ‘अन अफेअर टू रिमेंबर’ वरून  असल्याचे म्हटले जाते.

हेही वाचा –

टेलिव्हिजनवरील सोज्वळ अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल, बोल्डनेसने केले चाहत्यांना घायाळ

‘माझ्या मुलाला बर्गर विकताना पाहायचयं’ करोडो रुपये कमावणाऱ्या अभिनेत्रीचे अजब स्वप्न

‘चित्रपट आला की याला देशभक्ती आठवते’, म्हणत अक्षय कुमारवर संतापले नेटकरी, पाहा काय आहे प्रकरण

हे देखील वाचा