राज कुंद्रा प्रकरणात शिल्पा शेट्टीचा ‘हंगामा २’ झाला प्रदर्शित; चित्रपटावर होणार परिणाम?


बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या आयुष्यात सध्या तिचा पती राज कुंद्रामुळे चांगलाच हंगामा चालला आहे. अश्लील चित्रपट बनवल्या प्रकरणी त्याला अटक केले आहे. याचा फटका शिल्पाला आधीच बसला आहे. तिला ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या शोमधून बाहेर काढले आहे. त्यामुळे तिचे आधीच नुकसान झाले आहे. यातच तिचा ‘हंगामा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटासाठी शिल्पा खूप उत्साहित होती. मागील अनेक दिवसांपासून चित्रपटाची टीम प्रमोशन करत होती. तिचा चित्रपट शुक्रवारी (२३ जुलै) प्रदर्शित झाला आहे. पण तिला चाहूल देखील लागली नसेल की, या दिवसात तिच्या आयुष्यात असं काही होणार आहे. 

शिल्पा शेट्टीच्या ‘हंगामा २’ या चित्रपटात जावेद जाफरी यांचा मुलगा मिजान जाफरी आणि बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार परेश रावल हे आहेत. शिल्पा शेट्टी या दिवसात राज कुंद्रामुळे खूप चर्चेत आहे. पण आता या गोष्टीचा फटका तिच्या चित्रपटावर पडेल की नाही या गोष्टीचा अनेकजण विचार करत आहेत. तिचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डीज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला आज रात्रीपर्यंत कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणे महत्वाचे आहे.

‘हंगामा 2’ या चित्रपटाचे निर्माते रतन जैन यांच्या मते, राज कुंद्रा याला अटक झाल्याचा परिणाम शिल्पा शेट्टीच्या चित्रपटावर पडणार नाही. त्यांनी मीडियासोबत बोलताना सांगितले आहे की, “शिल्पा एक कलाकार आहे. तिने तिचे काम केले आहे. या प्रकरणात तिच्याविरुद्ध कोणताच पुरावा सापडला नाही. मग याचा परिणाम चित्रपटावर का पडेल?? विनाकारण तिचे नाव या प्रकरणात जोडले जात आहे.” (In between case of Raj Kundra, Shilpa Shetty’s hangama 2 movie release)

शिल्पा शेट्टीने जवळपास १४ वर्षानंतर चित्रपटात पुनरागमन केले आहे. तिने बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या चित्रपटासाठी तिने खूप तयारी केली होती. हा प्रोजेक्ट यशस्वी होण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली आहे.

‘हंगामा’ हा चित्रपट १८ वर्षापूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अक्षय खन्ना, परेश रावल यांसारखे कलाकार होते. आता ‘हंगामा २’ मध्ये परेश रावलसोबत मिजान जाफरी, प्रणिता सुभाष आणि शिल्पा शेट्टी आहे. या चित्रपटात ती परेश रावल यांच्या पत्नीची भूमिका निभावत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आयुष्यभर तुरुंगात सड’ म्हणत राज कुंद्रावर आरोप लावणारी पुनीत कौर नक्की आहे तरी कोण? वाचा

-कृष्णा श्रॉफचा टॉपलेस फोटो पाहून दिशा पटानीही झाली हैराण; प्रतिक्रिया देत म्हणाली, ‘तुझी बॉडी…’

-मुलगा करणला सनी देओल देत नाही कोणताच सल्ला; पहिला चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर एकटा पडला होता अभिनेता


Leave A Reply

Your email address will not be published.