अभिनेता आमिर खान आता लग्नबंधनात अडकलेला आहे. तर त्याचे हे तिसरे लग्न आहे. आणि त्यानी गौरी स्प्रॅट सोबत लग्न केले आहे. त्याचा हा विवाह 5 जुलै 2026 रोजी पार पडला. त्यादरम्यान चाहत्यांना आमिर खानने गौरी स्प्रॅटची ओळख करून दिली, या दोघांनी अभिनेत्याच्या मुंबईतील घरी जवळचे कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत एका खाजगी नागरी समारंभात लग्न केले.
आमिर खान आणि गौरीने लग्नाच्या कागदपत्रांवर सह्या केल्यानंतर लगेचच, आमिर आणि गौरीचा पहिला फोटो ऑनलाइन समोर आला आणि आता या दोघांचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये अभिनेता लग्नानंतर आनंदाने नाचताना दिसत आहे आणि गौरीसुद्धा त्याच्यासोबत नाचत आहे.
आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांनी कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत त्यांच्या लग्नाच्या कायदेशीर कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. आमिर खानने पांढरा बंदगला कुर्ता-पायजमा परिधान केला होता, तर गौरीने सुंदर लेहेंगा घातला होता. आमिरची तीन मुले, आयरा खान, जुनैद खान आणि आझाद राव खान, हे देखील त्यांच्यासोबत दिसले. या सोहळ्यात गौरीचा मुलगाही उपस्थित होता. त्यांच्या लग्नाच्या फोटोंना सोशल मीडियावर चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत आहे. तसेच काहीच्या मते हे लग्न किती दिवस टिकेल असा ही प्रश्न केला जात आहे.
आमिर खान आणि गौरी यांच्या लग्नाला अंबानी कुटुंब, राज ठाकरे, राजकुमार हिरा, हे दिग्गज मंडळी उपस्थित होती तसेच वृत्तानुसार, बाकिच्या मित्र परीवारासाठी आमिर खान नंतर रिसेप्शन पार्टीचे आयोजन करणार नाहीत. आमिर खानचे खुप आधीपासुन ठरले होते की, हा कार्यक्रम खाजगी आणि मोजक्याच लोकांत संपन्न होईल.
हेही वाचा
‘बेबी डू डाय डू’ला बॉक्स ऑफिसवर अपयश; ‘अल्फा’समोर हुमा कुरेशीचा चित्रपट फिका










