‘व्हॅलेन्टाइन डे’ चा अतिशय सुंदर आणि सुयोग्य मुहूर्त साधत, मराठीतील सर्वात लोकप्रिय जोडी आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील विवाहबंधनात अडकले आहेत. मागच्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाच्या चर्चा खूपच रंगल्या होत्या. त्यांच्या केळवणाचे, लग्नापूर्वीच्या विधींचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.
या दोघांनी त्यांचे लग्न रजिस्टर पद्धतीने केले असून, त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नाच्या मोठ्या थाटामाटाला बाजूला सारत या दोघांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केले. अगदी मोजक्या नातेवाईक आणि मित्र, मैत्रिणींच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केले आहे. यावेळी आस्ताद आणि स्वप्नाली या दोघांचा एकदम जबरदस्त असा रॉयल लूक पाहायला मिळाला.
आस्ताद आणि स्वप्नील मागच्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. सर्वात आधी आस्तादने बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात स्वप्नालीसोबतच्या नात्याची कबुली दिली होती. तेव्हापासून त्यांच्या फॅन्सला या दोघांच्या लग्नाची खूप उत्सुकता होती.
या रजिस्टर लग्नाच्या वेळी स्वप्नालीने एक हटके आणि सुंदर उखाणा घेतला. या उखाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. स्वप्नालीने ‘बागेत बाग राणीची बाग, आस्तादचा राग म्हणजे धगधगणारी आग’ असा उखाणा घेत, आस्तादला अंगठी घातली.
या दोघांच्या लग्नाला मेघ धाडे, अभिजित केळकर, हर्षदा खानविलकर यांसारखे अनेक कलाकार उपस्थित होते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…