80 ते 90 च्या दशकात अनेक मालिका होऊन गेल्या त्यातीलच एक म्हणजे ‘चंद्रकांता’ ही मालिका आहे. हि मालिका 1994 साली सुरु झाली होती. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते यातील कथा आणि त्यातील कलाकरांच्या अभिनयामुळे हि मालिका प्रचंड गाजली. या मालिकेची क्रेझ इतकी होती की प्रेक्षक मालिकां पाहण्यासाठी दैनंदिन कामे सोडून देत असत. तर या मालिकेत विनोद कपूर, शिखा स्वरूप, मामिक सिंग, अखिलेंद्र मिश्रा आणि कृतिका देसाई यांसारखे कलाकार होते. चंद्रकांता’ने आणखी एक अभिनेत्रीच्या कारकिर्दीलाही चालना दिली ती व्यक्ती म्हणजे वर्षा उसगावकर. या मध्ये वर्षा यांना नागराणी रुमती ही नकारात्मक भूमिका साकारली होती आणि ही भुमिका प्रेक्षकांना उत्तम भावली होती.
वर्षा (varasha)उसगावकर या गोव्याचे माजी उपसभापती ए. के. उसगावकर यांच्या कन्या आहेत. त्या एस. उसगावकर यांच्या कन्या असून आज मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत एक सुप्रसिद्ध नाव बनल्या आहेत. वर्षा आजही ‘चंद्रकांता’मधील ‘नागरानी’ म्हणून ओळखली जाते. ही मालिका 32 वर्षे प्रसारित होत असली तरी, आजही प्रेक्षकांच्या मनात हि मालिका जिवंत आहे. त्यानंतर अनेक उत्तम चित्रपटामध्ये त्यांनी काम केले असुन आज हि त्या अनेक मराठी मालिकामध्ये काम करत असतात.
वर्षा उसगावकर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास त्यांचे लग्न प्रसिद्ध संगीतकार रवी शंकर शर्मा यांचे पुत्र अजय शंकर शर्मा यांच्याशी झाले आहे. मात्र, वर्षा आणि तिच्या सासरच्या मंडळींमध्ये नेहमीच मतभेद होते. इतकेच नाही तर, तिच्या सासऱ्यांनी तिच्या पतीला मालमत्तेतून बाहेर काढले. ज्यामुळे न्यायालयात खटला दाखल झाला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
पेड्डी सिनेमासाठी चाहत्यांना आणखी वाट पाहावी लागणार, निर्माते लवकरच नवीन तारीख जाहीर करणार










