Thursday, March 5, 2026
Home बॉलीवूड अभिनव शुक्ला ‘या’ आजाराने आहे ग्रस्त, तर आजार स्वीकारण्यास लागली तब्बल 20 वर्षे

अभिनव शुक्ला ‘या’ आजाराने आहे ग्रस्त, तर आजार स्वीकारण्यास लागली तब्बल 20 वर्षे

सामान्य लोकांना नेहमीच कलाकार आणि त्यांच्या अलिशान, ग्लॅमर जगाचे, नशिबाचे खूप अप्रूप आणि सोबतच हेवा देखील वाटतो. त्यांना कोणतेच टेन्शन नसेल अशाच गोड गैरसमज सर्वांचा असतो. मात्र असे नाहीये. सामान्य लोकांसारख्या अनेक समस्या अनेक टेन्शन कलाकरांना देखील असतात, फरक एवढाच असतो की ते कॅमेरा समोर सर्व काही नॉर्मल असल्यासारखे वागतात.

‘बिग बॉस 14’ फेम अभिनेता अभिनव शुक्ला हा टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील हार्टथ्रॉब म्हणून ओळखला जातो. एक उत्तम अभिनेत्यासोबतच उत्तम फोटोग्राफर आणि अतिशय हुशार असणाऱ्या अभिनवने नुकतेच त्याच्या आयुष्यातील एक मोठे गुपित उघड केले आहे. अभिनव मागच्या अनेक वर्षांपासून एका आजाराने ग्रस्त असल्याचे त्याने सांगितले आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाकत त्याने ही माहिती दिली. त्याला बॉर्डरलाइन डिस्लेक्सिक हा आजार आहे. (abhinav shukla is suffering from borderline dyslexia)

याबद्दल सांगताना त्याने ट्वीट केले आणि लिहिले, “मी बॉर्डरलाइन डिस्लेक्सिक आहे आणि आता हे सगळ्यांना समजले असल्यामुळे मी याबद्दल मोकळेपणाने बोलणार आहे. यात माझी किंवा इतर कुणाची चूक नाही. मला हे स्विकारण्यास दोन दशकं लागली आहेत. आता मला संख्या आणि आकडे लाजवत नाही. माझ्यात दुसऱ्या काही असाधारण क्षमता आहेत.”

अभिनवने त्याच्या या ट्विटचा स्क्रिनशॉट टाकून त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट टाकत लिहिले, “हो आकडे, अक्षरं आणि शब्दांमध्ये माझा गोंधळ होतो. मला तारीख, नाव तसेच एखाद्या तारखेशी संबंधित गोष्टी लक्षात ठेवण्यास खूप कठीण जाते. मात्र काही गोष्टींमध्ये मी परफेक्ट आहे. मला अनेक गोष्टी माझ्या गाडीच्या डिक्कीत ठेवायला सांगितल्या तर मी त्या सर्व नीट करू शकतो. मी काही गोष्टींमध्ये चांगला आहे तर काहींमध्ये वाईट. या गोष्टी सुधारण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो.”

अभिनवने सोशल मीडियावर पोस्ट करण्याआधीच ‘खतरों के ख‍िलाड़ी 11’च्या एका भागात त्याने या आजाराबद्दल खुलासा केला. या शोच्या एका भागात अभिनव श्वेता तिवारीसोबत टास्क करत असताना त्याने, त्याला अंक आणि अक्षर लक्षात ठेवायला समस्या असल्याचे सांगितले. हा भाग प्रदर्शित झाल्यानंतर अभिनवने सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट लिहीत स्पष्टपणे त्याच्या आजारबद्दल सांगितले आहे. त्याच्या पोस्टनंतर अनेक कलाकारांनी त्याला पाठिंबा देत, त्याच्या हिंमतीचे कौतुक केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

अरुणिता कांजिलालसोबतच्या आपल्या नात्यावर पवनदीप राजनचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘आम्ही एकमेकांच्या खूपच…’

सुपर्ब! मराठमोळ्या अनुजा साठेचा वर्कआऊट पाहून तुम्हीही व्हाल थक्क; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

‘आता तिला पाहून काळजाचा ठोका चुकणार नाही, तर कायमचा थांबणार’, ‘रात्रीस खेळ चाले ३’ चा प्रोमो प्रदर्शित

 

हे देखील वाचा