Friday, December 8, 2023

अभिषेकच्या संघर्षाच्या काळाबद्दल ऐकून अमिताभ झाले भावुक म्हणाले, “मला तुझा अभिमान आहे…”

महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या मुलाने अर्थात अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) ने २००० साली जे. पी. दत्ता यांच्या ‘रिफ्यूजी’ (Refugee) या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यासिनेमात त्याच्यासोबत करीना कपूर (Kareena Kapoor) झळकली होती. करिनाने देखील याच सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. मागील दोन दशकांमध्ये अभिषकने अनेक हिट अनेक फ्लॉप सिनेमे दिले. काही आव्हानात्मक भूमिकांमधून त्याने स्वतःला एक प्रभावशाली अभिनेता म्हणून देखील सिद्ध केले. चित्रपटांसोबतच त्याने वेबसिरीजमध्ये देखील काम केले.

अभिषेकला अनेकदा त्याच्या अभिनयावरून आणि इतर अनेक गोष्टींवरून ट्रोल केले गेले. त्याला अभिनयावरून ट्रोल केले गेले तरीही त्याने स्वतःवरचा विश्वास कायम ठेवत काम करत राहिला. सध्या अभिषेक ‘बॉब विश्वास’ या त्याच्या सिनेमासाठी चर्चेत असून, त्याच्या यातील अभिनयाचे खूपच कौतुक केले जात आहे. सध्या तो या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान त्याने एका मुलाखतीदरम्यान अनेक गोष्टींबद्दल मनमोकळा संवाद साधला. यावेळी अभिषेकने त्याच्या पदार्पणाबद्दल सांगितले. जेव्हा तो इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत होता त्या काळाबद्दल बोलताना तो म्हणाला की त्याच्या वडिलांनी अमिताभ बच्चन यांनी त्याच्यासाठी ना ही कोणता सिनेमा बनवला ना ही त्यांनी त्यांच्यास्तही कोणाकडे शब्द टाकला.

एका मुलखातीदरम्यान अभिषेक म्हणाला, “मला माझा पहिला सिनेमा मिळण्यासाठी जवळपास दोन वर्षाचा काळ लागला. खूप लोकांना वाटते की, अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे, तर त्याच्या घरासमोर २४ तास लोकांची रांग असेल. पण असे अजिबात नव्हते. या क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी मी प्रत्येक दिग्दर्शकाकडे जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. पण त्यांनी माझ्यासोबत काम न करण्याचे ठरवले होते आणि ते पण योग्यच होते.

यासोबतच त्याने त्याच्या २१ वर्षांच्या करिअरमध्ये आलेल्या अनेक उतार चढावांबाबत सांगितले, “मी काम करणाऱ्या कलाकाराच्या चांगल्या बाजू पहिल्या आहेत, आणि बेरोजगार कलाकारांची बाजू देखील पाहिली आहे. मुद्दा हा आहे की, तुम्ही गोष्टी वैयक्तिक पातळीवर घेऊ शकत नाही. सरतेशेवटी हा व्यवसाय आहे. जर तुमचे सिनेमे चांगला व्यवसाय करू शकत नाही तर दुसरे लोकं तुमच्यावर पैसे लावू शकत नाही. या २१ वर्षांच्या काळात मी खूप चढ उतार पाहिले आहे. खूप वेळा मानसिक त्रास झाला, खूपदा तुटलो.”

अमिताभ बच्चन यांनी अभिषकच्या या मुलाखतीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक संदेश लिहीत अभिषेकचा आत्मविश्वास वाढवत लिहिले, “संघर्षाशिवाय जीवनात काहीही मिळत नाही. तुझ्या संघर्षाचा मला अभिमान आहे. तू जे काही मिळवले आहे त्यात मी खुप आनंदी आहे. आजोबांचे शब्द आणि आशीर्वाद, पिढ्यान पिढ्या आपल्याला साथ देतात. हीच नेहमीची शिकवण.” अभिषेकच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचे झाल्यास, “SSS-7 आणि दसवी” हे प्रोजेक्ट २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा