Saturday, April 26, 2025
Home बॉलीवूड ‘तेव्हा तो क्लासिक सिनेमा बनतो’ म्हणत अभिषेक कपूरने सुशांतची आठवण काढत लिहिली ‘काय पो चे’ सिनेमावर भावनिक पोस्ट

‘तेव्हा तो क्लासिक सिनेमा बनतो’ म्हणत अभिषेक कपूरने सुशांतची आठवण काढत लिहिली ‘काय पो चे’ सिनेमावर भावनिक पोस्ट

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतला अजून दोन वर्षापेक्षा अधिक काळ झाला. मात्र असे असले तरी त्याला अजूनही कोणीच विसरलेले नाही. सुशांतने त्याची छाप इतक्या खोलवर लोकांच्या मनात पडली आहे, की इतक्या सहजासहजी ती काढणे सोपे नाही. सुशांत जरी आज आपल्यात नसला तरी त्याचे सिनेमे सतत त्याच्या असण्याची आठवण लोकांना करून देतात. टेलिव्हिजन इंडस्ट्रीपासून सुरु झालेला सुशांतचा प्रवास बॉलिवूडपर्यंत पोहचला होता, तोही अगदी यशस्वी पद्धतीने. सुशांतने दिग्दर्शक अभिषेक कपूर यांच्या ‘काई पो चे’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. २२ फेब्रुवारी २०१३ रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि तुफान गाजला. या सिनेमाला १० वर्ष पूर्ण झाले आणि याच निमित्ताने दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिषेक कपूर यांनी या सिनेमातील काही फोटो पोस्ट करत लिहिले, “जेव्हा कोणता सिनेमा एक दशक पूर्ण करतो आणि लोकांच्या मनात जागा निर्माण करतो तेव्हा त्याला क्लासिक सिनेमा म्हटले जाते. माझे नशीब चांगले होते की मला सुशांत सिंग राजपूत,राजकुमार राव आणि अमित साध तीन उत्तम कलाकार मिळाले. हे तिघं एकत्र एकदम डायनामाइट होते. यांना मानव कौल सरीखे थेस्पियनची सोबत मिळाली. हीच धमाक्याची रेसिपी होती.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek kapoor (@gattukapoor)

अभिषेक कपूरने पुढे अभिनेत्री अमृता पुरी, लेखक पुबाली चौधरी आणि क्रू मेंबरला धन्यवाद म्हटले. त्तपूर्वी ‘काय पो चे’ हा सिनेमा लखक चेतन भगत यांच्या ‘3 मिस्टेक्स ऑफ माइ लाइफ’ या कादंबरीवरून घेतला होता. या पोस्टसोबत अभिषेक यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये सुशांत, राजकुमार आणि अमित एकत्र दिसत आहे. त्यांनी या पोस्टमध्ये हे देखील सांगितले की, हा सिनेमा सुरु झाल्यापासून रिलीज होईपर्यंत चार वर्षांचा काळ गेला. तीन नवीन चेहऱ्यांसोबत त्याचा काम करण्याचा अनुभव एकदम भन्नाट होता. या सिनेमाचा प्रीमियर ‘बर्लिन’ फिल्म फेस्टिवलमध्ये झाला होता. सिनेमा संपल्यानंतर त्याला स्टँडिंग ओव्हेशन मिळाले होते.

अभिषेक कपूर यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यासोबतच अनेक कलाकार देखील यावर प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी सुशांतची आठवण कढत त्याचा हा उत्तम सिनेमा असल्याचे सांगितले. तर काहींनी सुशांतवर बायोपिक करण्याचा सल्ला दिला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मल्याळम अभिनेत्री सुबी सुरेश यांचे वयाच्या ४१ व्या वर्षी दुःखद निधन

साऊथ इंडस्ट्रीमधील ‘हे’ दिग्गज अभिनेते किडनी स्टोनवरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल

हे देखील वाचा