Friday, March 29, 2024

एक- दोन लाखात खेळणाऱ्यातले नाहीत मांजरेकर, वाचा एका एपिसोडसाठी किती रुपये छापतात मराठी कलाकार

कलाक्षेत्र हे एक असं क्षेत्र आहे, ज्यामध्ये अमाप पैसा असतो, पण हो कष्टही तेवढेच असतात बरं का?? टीव्ही मालिकांबद्दल बोलायचं झालं, तर तिथेही अगदी 18-18 तास काम करावं लागतं या कलाकारांना. मग आता जरा विचार करा की, एवढ्या कष्टाचा मोबदला तर मिळायलाच हवा ना. कधी- कधी तर आपण असंही ऐकतो की, कोणाला वेळेवर मानधन मिळत नाही, कोणाला सेटवर कामापेक्षा कमी मानधन मिळतं आणि तो कलाकार ती मालिक सोडून जातो. आपल्याला अचानक त्याच्या जागी दुसरा कलाकार दिसतो. त्या मागचं कारण असतं ते म्हणजे मानधन. तुम्हाला माहितीये का मराठी मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना किती मानधन मिळतं? चला तर जाणून घेऊया मराठी मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांबद्दल.

दिव्या पुगावकर
मराठी मनोरंजन विश्वातील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेला सध्या रसिक प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळवलं होतं. जन्मताच मूक असणाऱ्या या माऊने सगळ्या समाजाचा तिरस्कार सहन केलाय. अगदी जन्मदात्या आई- वडिलांनी देखील जन्मताच तिला अंतर दिलं. परंतु तिनं सगळ्या परिस्थितीला तोंड देत तिचं स्थान निर्माण केलं. मोठी झाल्यानंतर तिच्या नशिबी कुटुंबाचं प्रेम आणि माया मिळाली. लहानपणी न मिळालेली प्रत्येक गोष्ट तिच्या आई-वडिलांनी तिला दिली. मालिकेत सुरुवातीपासून एकही डायलॉग न बोलणाऱ्या माऊने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. मालिकेत ही सुंदर भूमिका दिव्या पुगावकर निभावताना दिसली होती. ती एका एपिसोडसाठी जवळपास 27 हजार रुपये एवढं मानधन घेते. आता दिव्या ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत काम करत आहे.

ऋता दुर्गुळे
‘फुलपाखरू’ मालिका पाहिलीय का? असं विचारलं तर सर्वांचं उत्तर कदाचित नक्कीच हो असंच येईल. येणारंच की कारण या मालिकेतील वैदेही अन् मानसच्या प्रेमकहाणीने तरुणाईला भुरळ घातली होती. ही मालिका आता बंद झालीय पण, वैदेहीची भूमिका साकारणाऱ्या ऋता दुर्गुळेची क्रेझ अजूनही कायम आहे. हीच ऋता आपल्याला ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतही झळकताना दिसली होती. यात ती जबाबदार घरातील मुलीच्या भूमिकेत होती. या मालिकेच्या एका एपिसोडसाठी ती 27 हजार रुपये मानधन घेतले होते.

मधुराणी प्रभूलकर
‘आई कुठे काय करते’ ही मालिका एका मध्यमवर्गीय स्त्रीच्या आयुष्यावर आधारित आहे. तिचं आयुष्य हे तिची मुलं, आणि पतीची सेवा या वर्तुळातच फिरत असतं. मात्र, तिचा पती तिला अंधारात ठेवून ऑफिसमध्ये एका मुलीच्या प्रेमात असतो. पण या सर्व गोष्टी तिला समजल्यानंतरही ती खूप ध्यैर्यानं या गोष्टी स्वीकारून त्यातून बाहेर पडते. तसेच तिचं करिअर घडवण्यासाठी घराबाहेर पडते. ही भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर साकारतेय. आता तुम्ही म्हणाल, मालिकेत स्त्री वर्गाला प्रेरणा देणाऱ्या या अभिनेत्रीचे मानधन तरी किती? तर मंडळी, ही अभिनेत्री एका एपिसोडसाठी तब्बल 25 हजार रुपये घेते.

श्रेयस तळपदे
हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत नाव कमावणारा मराठमोळा, हँडसम लूक असणारा, तरुणींमध्ये आपल्या अभिनयाची भूरळ पाडणारा अभिनेता आहे श्रेयस तळपदे. श्रेयस गोलमाल अगेन, गोलमाल रिटर्न्स, पोस्टर बॉयज अशा अनेक सिनेमात झळकलाय. पण आता तो छोट्या पडद्यावरही झळकला होता. त्याच्यासोबत ‘लाफ्टर क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी प्रार्थना बेहेरे ही एक लहान मुलीच्या आईचा रोल साकारत होती. तो ‘तुझी माझी रेशीमगाठ’ या मालिकेत एका कंपनीचा मालक म्हणून काम करत होता. मुख्य भूमिका साकारणाऱ्या हाच श्रेयस एका एपिसोडसाठी जवळपास 40 हजार रुपये मानधन घेतले होते.

आर्या आंबेकर
आपल्या सुरेल सुरांनी सर्वांच्या हृदयावर नाव कोरणारी गायिका म्हणजे आर्या आंबेकर. लहानपणापासूनच आर्याला गाण्याची आवड होती. तिची आई सुद्धा शास्त्रीय गायिका आहे. त्यामुळे तिच्या आईचं स्वप्न होतं की, आर्यानं सुद्धा गायन शिकावं. नंतर लहान असतानाच आर्याची निवड झी सारेगामापाच्या लिटिल चॅम्प्समध्ये झाली आणि तिथून तब्बल 50 स्पर्धकांमधून तिची निवड झाली. त्यानंतर तिच्या गाडीनं जो वेग धरला, तो काही थांबलाच नाही. सारेगामापा लिटिल चॅम्प्समधून घराघरात पोहोचणारी आर्याने रियॅलिटी शोमध्ये उपविजेतेपद पटकावले. हीच आर्या आज पुन्हा सारेगामापा लिटिल चॅम्प्सच्या खुर्चीवर विराजमान झाली होती. आर्या आज एका एपिसोडचे 50000 रुपये घेते.

महेश मांजरेकर
अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते अशा अनेक भूमिका लिलया पार पाडणारे कलाकार म्हणजे महेश मांजरेकर. त्यांनी ‘वास्तव’, ‘एहसास’, ‘कांटे’, ‘मुसाफिर’, ‘वाँटेड’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘नटसम्राट’ यांसारख्या हिट सिनेमांची निर्मिती केलीय. आता हेच मांजरेकर छोट्या पडद्यावरही झळकताना दिसतायत. ते ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात होस्टिंग करत होते. त्यानंतर त्यांनी चौथ्या पर्वाचेही होस्टिंग केले होते. यामध्ये त्यांना एका एपिसोडसाठी 1-2 लाख नव्हे, तर तब्बल 25 लाख रुपये मानधन घेतल्याच्या चर्चा होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ आहेत हिट सिनेमे देणाऱ्या मांजरेकरांबद्दल माहित नसलेल्या गोष्टी, महेश बाबूच्या पत्नीसोबत होतं अफेअर?
जेव्हा अवॉर्ड फंक्शनमध्ये आमिर, शाहरुख आणि सैफ दिसले होते एकत्र, तेव्हा…

हे देखील वाचा