काही दिवसांपूर्वी आमिर खान याचा भाऊ फैजल खान हा बिग बॉस या शोची ऑफर मिळाल्याने चर्चेत आला हाेता. मात्र, त्याने सहभाग घेण्यास नकार दिला हाेता. अलीकडेच ताे एका मुलाखतीत बॉलिवूड बाॅयकाॅट, नेपोटिझम आणि वादग्रस्त रियॅलिटी शोबद्दल बोलला.
माध्यमांशी बोलताना तो म्हणाला, “बॉलिवूडमध्ये खूप भ्रष्टाचार आहे. येथे नेपाेटिझम हाेते.” त्याचबरोबर बॉलिवूड इंडस्ट्रीवर आरोप करताना ताे म्हणाला की, “इथे फक्त सेक्सचा विचार केला जातो. हे सर्व चित्रपट, कपडे आणि कंटेंट यावरून दिसून येते.” यादरम्यान फैजलने रिमेक करणाऱ्या निर्मात्यांवरही चांगलाच राग काढला.
मुलाखतीदरम्यान फैजल खानने (Faisal Khan) बॉलिवूड इंडस्ट्रीवर माेठे आरोप केले. ताे म्हणाला की, “येथे सर्वाधिक गटबाजी आहे. संपूर्ण इंडस्ट्री भ्रष्टाचाराने भरलेली आहे. इथे नेपोटिझम एवढे आहे की, बाहेरच्यांना करिअर घडवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो.” ताे म्हणाला की, “येथे नेपोटिझममुळे लोकांना काम मिळते, पण ते फार काळ टिकू शकत नाही. कारण, प्रेक्षक त्यांच्या अभिनयाला पंसती देतात.”
मुलाखतीदरम्यान फैजलने रिमेक बनवणाऱ्या लोकांची खिल्ली उडवली. तो म्हणाला, “आम्ही लाेक फक्त साऊथ चित्रपटांचे रिमेक बनवत आहोत. कारण, आपल्याकडील क्रिएटिव्हिटी संपली आहे आणि आता चांगले लेखक देखील राहिले नाहीत, पण दक्षिणेकडील लोकांकडे ओरिजनल कंटेंट आहे. ते त्यांच्या चित्रपटांवर प्रामाणिकपणे काम करतात आणि त्यामुळेच त्यांचे चित्रपट हिंदी सिनेसृष्टीतही पसंत केले जातात.” बॉलिवूड कलाकारांच्या प्रतिमेबद्दल बोलताना ताे म्हणाला की, “अं’मली पदार्थ प्रकरणात इथल्या सेलिब्रिटींची नावे येत आहेत. इंडस्ट्रीतील लाेकांना आपली प्रतिमा सुधारण्याची गरज आहे.”
फैजल खानच्या बॉलिवूड कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने आपल्या कारकीर्दीत ‘मेला’, ‘दुश्मनी’, ‘मदहोश’, ‘खतरा’, ‘कयामत से कयामत तक’, ‘फॅक्टरी’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, तो आपल्या भावाप्रमाणे इंडस्ट्रीत नाव कमवू शकला नाही.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मृत्यूपूर्वीही आणखी एक मृत्यू असतो…’, उर्वशीची खळबळजनक पोस्ट व्हायरल, चाहत्यांना आठवला रिषभ
ट्रोलर्सच्या नाकावर टिच्चून पहिल्याच आठवड्यात ‘ब्रह्मास्त्र’ची विक्रमी कमाई; आलिया म्हणाली…
भांडं फुटलं की! सोनाक्षी ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात; वरुणही म्हणाला, ‘याला म्हणतात ब्लॉकबस्टर जोडी’