आमिर खानच्या लेकीचा व्हिडिओ व्हायरल; दिसली बॉयफ्रेंडच्या हातात हात टाकून फिरताना


बॉलिवूड कलाकारांची मुलं नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. कदाचित याबाबतीत ते आपल्या आई- वडिलांनाही मागे टाकतात. यापैकीच एक म्हणजे आमिर खानची मुलगी आयरा खान होय. आमिर खान सोशल मीडियाचा वापर करत नसला, तरीही आयराचा सोशल मीडियावरील वावर जरा जास्तच आहे. तिच्या फॉलोवर्सची संख्या ४ लाखांपेक्षाही अधिक आहे. तिच्या आयुष्यातील अनेक किस्से सोशल मीडियावर ऐकायला, पाहायला मिळतात. सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंडही दिसत आहे. (Actor Aamir Khan Daughter Ira Khan Seen Walking On Steets Holding Hands With Her Boyfriend Video Viral)

मुंबईच्या रस्त्यांवर बॉयफ्रेंडच्या हातात हात टाकून फिरतेय आयरा
आयरा खानचा हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर वीरेंदर चावलाने शेअर केला आहे. या व्हिडिओत तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेही दिसत आहे. विशेष म्हणजे ते दोघे एकमेकांच्या हातात हात टाकून मुंबईतील बांद्रा येथील रस्त्यांवर फिरत आहेत.

या व्हिडिओत आयराने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाचे स्कर्ट परिधान केले आहे. तिच्या चेहऱ्यावर मास्क लावल्याचे दिसत आहे.

बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत रोमँटिक व्हिडिओ केला होता शेअर
खरं तर, यापूर्वीही एका व्हिडिओत आयराला पाहण्यात आले होते. त्यात ती बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत रोमँटिक अंदाजात दिसली होती.

याव्यतिरिक्त तिचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात ती आपल्या नावाचा योग्य उच्चार कसा करायचा, त्याबद्दल सांगत होती. यावेळी तिने असेही सांगितले होते की, जर तिच्या नावाचा उल्लेख इरा केला, तर ती त्यांच्यावर दंड लावेल. तिच्या या व्हिडिओने माध्यमांचेही लक्ष वेधले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘ओव्हर ऍक्टिंगचे दुकान’, म्हणत पॅपराजींसमोर ‘बिंधास्त’ पोझ देणारी निया शर्मा नेटकऱ्यांकडून ट्रोल

नादच खुळा! अंकुश राजाचे नवीन गाणे रिलीझ होताच झाले व्हायरल; नीलम गिरीच्या लूकने वेधले सर्वांचे लक्ष

-‘फादर्स डे’च्या निमित्ताने जॅस्मिन भसीनने आई वडिलांसाठी प्लॅन केले खास गिफ्ट; लवकरच देणार ‘हे’ सरप्राईज


Leave A Reply

Your email address will not be published.