Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

ट्रोलर्सला कंटाळून आमिरने एकदाच बोलून टाकले, ‘आता मला माफ करा’, व्हिडिओ पाहून चाहतेही भावूक

गुरुवारी (दि. ११ ऑगस्ट) आमिर खान याचा ‘लाल सिंग चड्ढा‘ हा बहुप्रतिक्षित सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीपासूनच चर्चेत आहे. विशेष म्हणजे, या सिनेमाला ट्विटरवर #BoycottLaalSinghChaddha हे हॅशटॅग वापरत बहिष्कृत केले जात आहेत. अशात सिनेमातील मुख्य अभिनेता आमिर खान याने सिनेमा बहिष्कृत करण्याच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली होती. तो नेमका काय म्हणाला होता, हे आपण जाणून घेऊया…

आमिर खान (Aamir Khan) याने या मागणीबाबत म्हटले होते की, “होय, मी दु:खी आहे. मला याचेही दु:ख आहे की, लोक असे म्हणत आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की, मी असा व्यक्ती आहे, ज्याला भारत आवडत नाही. त्यांना असे वाटते, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. हे दुर्दैवी आहे की, काही लोकांना असे वाटते. मात्र, हे असे नाहीये.” आमिर खानने चाहत्यांना  त्याच्या सिनेमाला योग्य संधी देण्याची विनंती केली आहे. तसेच, त्याने म्हटले आहे की, “कृपया माझ्या सिनेमावर बहिष्कार टाकू नका. माझा सिनेमा पाहा.”

आमिर खानने मागितली माफी
अशामध्ये त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आमिर खान हा माफी मागताना दिसत आहे. या व्हिडिओत आमिर असे म्हणताना दिसत आहे की, जर त्याचा सिनेमा कुणाला पाहायचा नसेल, तर तो यामध्ये काहीच करू शकत नाही. आमिर म्हणतो की, “जर मी कुणाला दुखावले असेल, तर त्याचे मला दु:ख आहे. मला कोणालाही दुखवायचे नाही. बाकी ज्या लोकांना सिनेमा पाहायचा नाही, मी त्यांच्या निर्णयाचा मान राखेल. मात्र, मी सांगेल की, अधिकतर लोकांनी हा सिनेमा पाहावा. सिनेमात फक्त मीच नाहीये. शेकडो लोकांच्या मेहनतीने सिनेमा बनतो. अपेक्षा करतो की, सिनेमा तुम्हाला चांगला वाटेल.” यावेळी आमिर भावूक झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

आमिरच्या या व्हिडिओवर चाहते जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, “आम्हाला तुम्हाला पाहून अभिमान वाटतो.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “आम्ही नक्की पाहू.” आणखी एकाने कमेंट करत लिहिले की, “भावा हा सिनेमा सुपरहिट होईल.”

विशेष म्हणजे, काही लोकांनी आमिरच्या सिनेमाला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. झालं असं होतं की, कोणीतरी आमिरच्या एका जुन्या व्हिडिओच्या काही क्लिप्स सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. हा व्हिडिओ २०१५दरम्यानच्या एका मुलाखतीचा होता. त्यामध्ये तो म्हणताना दिसत होता की, त्याची एक्स पत्नी किरण रावने त्याला सल्ला दिला होता की, ‘वाढत्या असहिष्णुते’मुळे तो इतर देशात जाऊ शकतो. यामुळे देशभरातून त्याच्याविरुद्ध तिखट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-
‘जर एखाद्या मुलीला सेक्स करायचा असेल, तर ती धंदा…’, प्रसिद्ध अभिनेत्याचे खळबळजनक वक्तव्य
अर्रर्र! भारती अन् तिच्या पतीने केली मोठी चूक? मुंबई पोलिसांनी धाडलं बोलावणं, सुजवून टाकला पाय
रणबीरची आलिया आहे लईच खमकी! अवघड सीनसाठी आजारी असूनही झालेली तयार, आख्ख्या सेटने वाजवलेल्या टाळ्या

हे देखील वाचा