बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अलीकडेच राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी त्यांच्या आयुष्याची नव्याने सुरुवात केली आणि आता सर्वांच्या नजरा कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाकडे लागल्या आहेत. हे जोडपे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात करणात असल्याचे म्हटले जात आहे.
अशातच बातमी येत आहे की, आमिर खानही तिसरे लग्न करणार आहे. अलीकडेच अभिनेत्याने त्याची दुसरी पत्नी किरण रावपासून अचानक घटस्फोट घेतला. त्यादरम्यान दोघांनीही आता आम्ही दोघे पती-पत्नी नसून सह-पालक आणि एकमेकांचे कुटुंब राहू, असे विधान केले होते. आमिर खान आणि किरण राव यांच्या या वक्तव्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. (actor aamir khan ready to marry his co star for the third time discussion started on social media)
आमिर खान सहकलाकारासोबत करणार लग्न
त्याचवेळी, आता सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की, आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करण्याचा विचार करत आहे आणि तो लवकरच तिसऱ्या लग्नाच्या बंधनात अडकताना दिसणार आहे. असा दावा केला जात आहे की, आमिर खान त्याचा आगामी चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ रिलीझ झाल्यानंतर लग्नाची घोषणा करेल. हा चित्रपट पुढील वर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी एप्रिलमध्ये आमिर चाहत्यांना त्याच्या लग्नाची बातमी देऊ शकतो, असे मानले जात आहे. इतकेच नाही, तर माध्यमातील वृत्तानुसार, आमिर त्याच्या एका सह-कलाकारासोबत लग्नगाठ बांधणार आहे.
आमिर खानच्या घटस्फोटानंतर ट्रोल झाली सना
आमिर खान आणि किरण रावच्या अचानक घटस्फोटानंतर अभिनेत्री फातिमा सना शेख सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली होती. फातिमा आमिर खानसोबत ‘दंगल’ आणि ‘ठग्स ऑफ हिंदूस्तान’ या चित्रपटात दिसली होती. आमिर आणि फातिमा रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. मात्र, हळूहळू ही अफवा शांत होत गेली.
आमिर खानने आतापर्यंत दोन लग्ने केली आहेत. १९८७ मध्ये अभिनेत्याने रीना दत्तासोबत पहिले लग्न केले. तर २००२ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर आमिर खानने किरण रावचा हात धरला, पण दोघांचे नातेही फार काळ टिकले नाही. आमिर खानला इरा खान, जुनैद खान आणि आझाद राव खान अशी तीन मुले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-उर्मिला कोठारेने केला एरियल डान्स, व्हिडिओ पाहून हटणार नाहीत तुमच्याही नजरा!