अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) सध्या त्याच्या ‘बॉब बिश्वास’ (Bob Biswash) चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. अभिनेत्याचा दमदार अभिनय पाहिल्यानंतर सगळ्यांनाच त्याची खात्री पटली आहे. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीही सोशल मीडियावर आपल्या मुलाच्या या चित्रपटातील दमदार अभिनयाचे कौतुक केले. या चित्रपटात अभिषेकने किलरची भूमिका केली होती. गेल्या काही वर्षांत अभिषेकने वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.
अभिषेकने अलीकडेच ‘द रणवीर शो’ या शोमध्ये रणवीर अल्लाबदियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्याची पत्नी ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हिने त्याला असे सरप्राईज दिले, जे पाहून तो आश्चर्यचकित झाला. त्याच्या आवडत्या गाण्याबद्दल बोलताना अभिषेक बच्चन म्हणाला की, “डिलेमा हे अमेरिकन रॅपर नेलीचे गाणे आहे. हे गाणे २००२ मध्ये प्रदर्शित झाले होते. केल्ली रोलँड या गाण्यात आहे.” (actor abhishek bachchan revealed get special surprise from aishwarya bachchan while dating)
डेटिंगच्या दिवसांमध्ये ऐश्वर्याने दिले होते ‘हे’ गिफ्ट
अभिषेकने खुलासा केला की, तो अमेरिकन गायक रॅपरचा खूप मोठा चाहता आहे आणि आजही हे त्याचे आवडते गाणे आहे. त्याने पुढे सांगितले की, “ज्या काळात आम्ही एकमेकांना डेट करत होतो, त्यावेळी ऍशने नेलीकडून तिच्या माईकवर ऑटोग्राफ घेऊन माझ्यासाठी आणली होती. जी आजही माझ्या टेबलावर आहे. हे आश्चर्यकारक आहे.”
अभिषेक पुढे म्हणाला की, त्याने नेलीसोबत गाणेही गायले आहे. मी हा ट्रॅक माझा मित्र राघव जो भारतीय कॅनेडियन गायक आहे त्याच्यासोबत केला आहे. राघवने माझ्याशी संपर्क साधला आणि सांगितले की, “अरे मी हे गाणे करतोय, तुला हे करावे लागेल. त्यात नेली देखील आहे, मी म्हणालो, खरचं.”
इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह ईस्ट २०१८ मध्ये अभिषेक म्हणाला, “मी माझ्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये पहिल्यांदाच ऐश्वर्यासोबत काम केले. आम्ही पहिल्यांदा ‘ढाई अक्षर प्रेम’मध्ये एकत्र काम केले होते. तेव्हापासून आम्ही मित्र होतो. ‘कुछ ना कहो’ हा आणखी एक चित्रपट आम्ही एकत्र करत होतो, त्यानंतर आमची मैत्री अधिक घट्ट होत गेली आणि हळूहळू आम्हाला ती मैत्रीपेक्षाही जास्त वाटू लागली. ‘उमराव जान’च्या वेळी आम्ही एकमेकांसाठी सिरियस होतो आणि नंतर ऐश्वर्याला प्रपोज केले आणि आता आम्हाला एक मुलगी आहे.” अभिषेक आणि ऐश्वर्याने २००७ मध्ये लग्न केले होते.
- हेही वाचा –
- ‘या’ व्यक्तीने आयुष्मान खुरानाच्या चित्रपटाला म्हटले ‘सॉफ्ट पॉर्न फिल्म’, काय असेल अभिनेत्याची प्रतिक्रिया
- काय सांगता! अर्शी खानने नग्न होऊन केलीय प्रेस कॉन्फरन्स, तर ‘या’ क्रिकेटपटूला म्हणाली होती तिच्या मुलाचा बाप
- सचिन तेंडुलकरच्या लाडक्या लेकीने ‘या’ व्यक्तीचा धरला हात! साराचे ‘डेट नाईट’चे फोटो व्हायरल.