बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना आपण दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करताना पाहिले आहे. असे खूप कमी वेळा होते की, दुसऱ्या एका इंडस्ट्रीमधील एखादा कलाकार दाक्षिणात्य चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसतो. परंतु बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात बॉलिवूडमधून नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून केले होते. चला तर मग जाणून घेऊया…
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री
ऐश्वर्या राय बच्चन
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने आपल्या कारकीर्दीची सुरुवात सन १९९७ मध्ये एका तमिळ चित्रपटातून केली होती. या चित्रपटाचे नाव ‘इरुवर’ असे होते. ऐश्वर्याने आपल्या अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली आणि बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री बनली.
दीपिका पदुकोण
खूप कमी चाहत्यांना माहिती आहे की, सन २००७ मध्ये रिलीझ झालेला ‘ओम शांति ओम’ हा चित्रपट ‘मस्तानी’ दीपिका पदुकोणचा पहिला चित्रपट नव्हता. होय, हे खरंय. दीपिकाने सन २००६ मध्ये कन्नड चित्रपट ‘ऐश्वर्या’ या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली होती.
प्रियांका चोप्रा
आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी बनलेली प्रियांका चोप्रा हिने सन २००२ मध्ये ‘तामिजहन’ या चित्रपटातून पाऊल ठेवले होते. दुसरीकडे तिचे बॉलिवूडमध्ये ‘हीरो’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटात प्रियांकासोबत सनी देओल मुख्य भूमिकेत होता.
दिशा पटानी
अभिनेत्री दिशा पटानी हिला आज ओळखत नाही, असा एकही चाहता मिळणार नाही. तिने आपल्या अभिनयाची सुरुवात दाक्षिणात्य ‘लोफर’ चित्रपटामधून केली होती. हा चित्रपट सन २०१५ मध्ये रिलीझ झाला होता.
क्रिती सेनन
अभिनेत्री क्रिती सेनननेही आपल्या अभिनयाची सुरुवात बॉलिवूड नाही, तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून केली होती. तिने ‘१: नेनोक्कादीन’ या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले होते.
या चित्रपटात क्रिती सेनन सुपरस्टार महेश बाबूसोबत दिसली होती.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-शाहिद करिनापासून ते सलमान- ऐश्वर्यापर्यंत ‘या’ पाच जोड्यांच्या ब्रेकअपने चाहते झाले चकित